ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त ३५ शिवभक्तांचे मुंडण आणि ४७ शिवभक्तांचे रक्तदान.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेडराजा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त,महापराक्रमी स्वराजरक्षक यांचा धर्मवीर बलिदान मास व बलिदान दिन मिती शुध्द प्रतिप्रदा ते फाल्गुन अमावास्या शनिवार दिनांक २९/०३/२०२५ रोजी मुंडण विधी आणि रक्तदानाने संपन्न झाला.

सर्वप्रथम शिवभक्तांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले,नंतर राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोर ३५ शिवभक्तांचे मुंडण आणि बोरखेड बा येथे ४७ शिवभक्तांनी रक्तदान करून अभिवादन केले.

   कार्यक्रमाचे आयोजन मावळा प्रतिष्ठान, जिजाऊ ग्रुप आणि बोरखेडी बा येथील गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अखिल भारतीय छावा संघटनेचा सहभाग,सिंदखेडराजातील शहरवासीयांच्या उपस्थिती, सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन नंतर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून मुंडण विधीची सुरुवात झाली.

छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण तेवत,स्वराज्य आणि धर्मासाठी त्याग आणि बलिदान नेहमी स्मरणात रहावे म्हणून मुंडन व रक्तदान करून सर्व शिवभक्तांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे…

पाहूनी शौर्य तुझपुढे

मृत्युही नतमस्तक झाला !

स्वराज्याच्या मातीसाठी,

माझे शंभुराजे अमर झाले !!

या पंक्तीद्वारे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाला शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ ग्रुप व बोरखेडी बा येथील ग्रामस्थ मंडळी सह ह भ प रावसाहेब कोल्हे,अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव,मराठा भूषण पुरस्कार प्राप्त डॉ. रामप्रसाद शेळके, छगनदादा मेहेत्रे उबाठा शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख, मा उपनगराध्यक्ष सिंदखेडराजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजय तायडे,मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील,अ भा छावा संघटनेचे पदाधिकारी कृष्णा कोल्हे, बाळासाहेब शेळके पाटील,रफीक सैय्यद, नारायण मस्के,राजु सिरसाठ, शिवसेना शहर प्रमुख उल्लास भुसारे,प्रदीप कोल्हे, परमेश्वर कोल्हे, बद्रिनाथ कोल्हे, ग विष्णू कव्हळे,दत्ता शेरे, गणेश कोल्हे, विजय शेरे, यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

धर्मवीर संभाजी महाराजांच्या शौर्याची आठवण तेवत राहण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे, असे मत यावेळी शिवभक्तांनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये