ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्गदर्शन शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर – महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे मार्गदर्शन उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन मालवी, गटशिक्षणाधिकारी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पंढरी मुसळे, केंद्रप्रमुख (कोरपना पंचायत समिती) उपस्थित होते. कोहपरे सर, काटकर मॅडम उपस्थित.या शिबिरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या मार्गदर्शन सत्रात शिक्षकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संकल्पना, शैक्षणिक क्षेत्रातील त्याचा उपयोग, तसेच अध्यापन प्रक्रिया सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी विविध तंत्रज्ञान साधनांची माहिती देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये