ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भांदेवाडा येथे श्री जगन्नाथ बाबा जन्मोत्सव व रामनवमी सोहळा

भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे विश्वस्त मंडळाचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   भांदेवाडा येथील ‘ब’ वर्ग तिर्थ क्षेत्र असलेल्या विदेही सदगुरु जगन्नाथ महाराज संस्थान येथे दि. ३० मार्च गुढीपाडवा ते ६ एप्रिल २०२५ श्रीराम नवमी या कालावधीत सदगुरु जगन्नाथ बाबा जन्मोत्सव व रामनवमी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन विदेही सदगुरु जगन्नाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष बबनराव धानोरकर यांच्यासह समस्त विश्वस्त मंडळाने केले आहे.

   यानिमित्य दि. ३० मार्च रोजी सकाळी ९.१६ वा. वसंतराव झोलबाजी धानोरकर यांच्या हस्ते घटस्थापना व गुढी उभारल्या जाईल. याप्रसंगी नागराज महाराज कळसकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

     तसेच दरोज संगीतमय श्रीमद भागवत व विदेही सदगुरू जगन्नाथ बाबा कथा ज्ञानयज्ञ सप्ताह भागवताचार्य ह. भ. प. प्रशांत महाराज भोयर (झरीजामनी ) यांच्या सुमधुर वाणीतून दररोज सकाळी ९.३० वा. ते १२वा. तसेच दुपारी ३.३० ते ६ वा.पर्यंत सादर केल्या जातील. दररोज सकाळी ५ वा.काकडा, सकाळी ७.३० वा. व. दुपारी १.३० वा. ज्ञानेश्वरी पारायण, सायं. ६.३० वा. हरिपाठ आणि रात्रो ९.३० वा. सुश्राव्य किर्तन त्यानंतर हरिजागर सादर केल्या जाईल. (ता. प्र.)

काकडा व हरिपाठ ,व्यासपिठ प्रवक्तते, अखंड विनावादन, सुश्राव्य किर्तन व पालख्यांचे आगमन

 याप्रसंगी ह.भ.प. बबलू महाराज व सोबत डोंगरगांव, पळसोनी, मुर्धोणी व पाखडगांव सामुदायीक संचाचे वतीने काकडा व हरिपाठ श्री चरणी अर्पण केल्या जाईल. ज्ञानेश्वरी पारायण प्रसंगी व्यासपिठावर प्रमुख प्रवक्ते म्हणून नामदेव शेलवडे, नंदा शेलवडे आणि रघुनाथ भोयर उपस्थित राहतील. अखंड विनावादनात बापुजी महाकुलकर, सोमेश्वर बुट्टेकर, मारोती केमेकर, देवराव दावे, तुळशीराम पारोधी, रामदास तिखट ,वामनराव वैद्य, विलास नरड आणि दिलीप कुमरे यांचा सहभाग राहील.

     दि. ५ एप्रिल रोजी रात्रो ९.३० वा. ह.भ.प. सुरेश महाराज तळवटकर सुश्राव्य किर्तन सादर करतील. दि. ६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा. सदगुरू जगन्नाथ बाबा जन्म सोहळयाचे रसामृत माहात्म्य व काल्याचे सुश्राव्य किर्तन ह.भ.प. प्रशांत महाराज भोयर सादर करतील. दि. ६ एप्रिल रोजी श्री सदगुरु जगन्नाथ बाबा जन्मोत्सव व रामनवमी सोहळ्याच्या निमित्याने दि. ५ एप्रिल किंवा त्यापूर्वी विविध स्थळावरून तसेच अनेक संस्थानामधून येणाऱ्या पालख्यांची पूजा व सहभागी बंधू -भगिनींचे स्वागत करण्यात येईल. 

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये