अवैधरित्या गोवंशाची वाहतूक ; आरोपी ताब्यात
नाकेबंदी करीत वाहन थांबवून सपूर्ण मुद्देमाल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 27/03/2025 रोजी पो स्टे आर्वी येथे खबर मिळाली की, वाढोना कडून आर्वी कडे वाहन क्रमांक MH 32 AJ 3146 महेंद्र बोलेरो पिक अप मालवाहू गाडी मध्ये गोवंश निर्दयतेने कोंबून नेत आहेत सदरच्या माहितीवरून सवलापुर शिवारात आणि पंचवटी चौक येथे नाकेबंदी करून वाहनास थांबून वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनात लहान मोठे 05 जनावरे निर्दयतेने कोंबून डाबून मिळून आले.
गाडी चालकास विचारपूस केली असता आणखी 05 गोवंश बैल गोरे नेरी पुनर्वसन येथे पडीत शेतात कत्तली करिता ठेऊन आहेत अशी कबुली दिली नेरी पुनर्वसन येथील पडीत शेतात जाऊन पाहणी केली असता तेथे एकाच दोराला बैल व गो-याची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता 05 लहान मोठे जनावर कत्तली करिता ठेवल्याचे व तेथुन गाडीमधे भरून अमरावती येथे कत्तलखाण्यात नेण्यात येणार होते असे सागितल्याने आरोपीताचे ताब्यातून एकूण लहान मोठे 10 गोवंश गोरे व बैल तसेच गोवंश वाहतुकी करिता वापरलेली वाहन क्रमांक MH 32 AJ 3146 महेंद्र बोलेरो पिक अप मालवाहू गाडी असा एकूण- 475000 रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त केला.
आरोपी 1) गोलू हुमे रा मायाबाई वार्ड 2) स्वप्नील साखरकर जनतानगर 3) अज्जू कुरशी रा- कुरैशी मोह्हला आर्वी यांचेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन आर्वीचे ठाणेदार पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर साहेब,पोलिस अंमलदार निरज लोही, दिगंबर रुईकर, अमर हजारे, अंकुश निचत, बाबासाहेब गवळी, मनीष राठोड, अमोल गोरटे, सागर पाचोडे, सूरज रिठे यांनी केली.