ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये महाराष्ट्रातील 253 डॉक्टरांचा जाहीर प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि डॉक्टर रामप्रसाद शेळके यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील 253 डॉक्टरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे.

         राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष,उपमुख्यमंत्री अजितदादां पवार यांचे मार्गदर्शनात त्याच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवत आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि डॉक्टर रामप्रसाद शेळके महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस याना दिलेली पदाची जबाबदारी पूर्ण करीत यांच्या नेतृत्वात तसेच डॉ. नितीन राजे पाटील आणि डॉ. संजय गवारे याच्या पुढाकाराने आदरणीय अजित दादा पवार यांच्या मुंबई स्थित देवगिरी बंगल्यावर कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता या पक्षप्रवेश कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील253 डॉक्टरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला या पक्ष प्रवेशाच्या वेळी माननीय हसीन मुश्रीफ साहेब आ डॉक्टर राजेंद्र शिंगणे खजिनदार शिवाजीराव गरजे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये