Sudarshan Nimkar
आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब आजार विशेष योगा शिबिराला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

योगा हे फक्त व्यायाम नसून आपले दैनंदिन जीवन जगण्याची कला - डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे

चांदा ब्लास्ट

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर आणि माधवबाग ,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग, मधुमेह, ब्लॉकेजेस, उच्चरक्तदाब, थायरॉईड आणि लठ्ठपणा या आजारांना परतवून लावण्याकरिता आणि आजार नियंत्रित करण्यासाठी विशेष शास्त्रोक्त योग शिबिराचे आयोजन रविवार दि. 25/6/2023 रोजी स्थानिक विद्या विहार कॉन्व्हेन्ट, तूकुम चंद्रपूर इथे करण्यात आले.

या योगशिबिराला चंद्रपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. या विशेष योग शिबिरात प्रसिद्ध योगप्रशिक्षक श्री.अनुप शर्मा व प्रणव गुजराती यांनी उपस्थिताकडून आजानुरूप योगाचे प्रात्यक्षिक करवून घेतले व आजानुरूप योगाचे महत्त्व व त्यानुसार मार्गदर्शन केले.

योगशिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब चंद्रपूर चे अध्यक्ष रोट.अजय जयस्वाल यांनी केले. योगा हे फक्त व्यायाम नसून आपले दैनंदिन जीवन जगण्याची कला आहे व आपण त्याला रोजच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणून स्वीकारायला हवे असे प्रतिपादन माधवबाग चे संचालक डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी आपल्या प्रास्ताविक मार्गदर्शनात केले. माधवबाग चंद्रपूरच्या संचालिका डॉ. प्रीती सरबेरे यांनी जीवनशैलीचे आजार नियंत्रित व Reverse करण्यात योगा चे महत्त्व व आजची गरज याविषयी मार्गदर्शन केले. तर रोटरी क्लब चंद्रपूर चे सचिव श्री.संतोष तेलंग यांनी आपल्या आभार प्रदर्शन मार्गदर्शनात रोटरी क्लब ,चंद्रपूर व्दारे घेण्यात येणाऱ्या समाजोपयोगी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व रोटरी क्लब चंद्रपूर चे अध्यक्ष रोट.अजय जयस्वाल यांनी उपस्थित 155 आरोग्यसाक्षर नागरिक आणि जीवनशैलीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना आजच्या योगाशिबिरात दाखविलेल्या आजारानुसार योगा ला आपल्या नियमित आयुष्यात आपण स्थान द्यावे असे आशावादी संबोधन उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवबागचे सामाजिक आरोग्य अधिकारी श्री.संजय ठेकाले यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेकरिता श्री.प्रमोद दुर्गे, प्रणाली जसवंत,सुप्रिया कष्टी,कु. सावी ढोरे, नीता उराडे, स्नेहा सांगोडे, वर्षा निमकर व श्री सत्यम यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

अशी माहिती रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर चे अध्यक्ष रोटे.अजय जयस्वाल तथा सचिव रोटे.संतोष तेलंग व माधवबाग चंद्रपूर चे संचालक डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे आणि डॉ प्रिती सरबेरे यांनी एका संयुक्त पत्रका द्वारे केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये