Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्प मित्राने सापाला दिले जिवदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 25/6/2023 रोजी देवाजी नगर वार्ड नं.4 सावंगी मेघे तहसील जिल्हा वर्धा पिता रंजित आकरे यांच्या घराच्या बाजूला सरकारी लाईटिंगची व्यवस्था नसून आजूबाजूला संपूर्ण जंगल परिसर आहे. या परिसरामुळे नागरिकांच्या घरामध्ये धूरमिळ असलेले नाग, साप, अजगर, मण्यार, अशे आढळत असतात. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला असून या गोष्टीची माहिती सांवगी मेघे चे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक व पोलिस पाटील यांना दिलेले असून आजपर्यंत त्यांनी घटनास्थळी पोहोचून लक्ष दिले नाही. आज हीच घटना पपीता आकरे यांच्या घराच्या आत सहा ते सव्वा सहा फुटाचा धामन नाग स्वयंपाक खोलीत दिसून आल्याने  तात्काळ संबंधितांनी सर्प मित्राला बोलावून येथे साप दडलेला आहे असे सांगितल्यावर सर्पमित्रांनी सापाला पकडून भरणी मध्ये बंद करून जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये