Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

तीन महिने लोटले : NRHM मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय थंडबस्त्यात

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वेधले लक्ष - मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना लिहिले पत्र - सेवेत सामावून घेतले नाही तर आंदोलन उभारू

चांदा ब्लास्ट

वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने  NRHM मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी 31 मार्च निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले होते. मात्र, 3 महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. शासनाने सभागृहात दिलेले आश्वसन पाळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.
 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (National Rural Health Mission) ही केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना असून, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात राज्य स्तरापासून ते गावपातळी पर्यंत विविध पदांवर कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. एकीकडे नियमित कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांचे कामाचे स्वरूप एकाच प्रकारचे असताना, हे कर्मचारी गेल्या 12 ते 15 वर्षापासून अल्प मानधनावर काम करत आहे, दरम्यान NRHM कर्मचाऱ्यांनी कोव्हिड काळात देखील महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या संघटनांनी कित्येकदा शासन दरबारी नियमित सेवेत कायम करण्याबाबत आंदोलन, मोर्चे काढले आहेत व वारंवार सरकारकडे सातव्या वेतन आयोगानुसार पगार आणि सेवेत कायम करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या मागणीला घेऊन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले होते. तेव्हा मंत्र्यांनी 31 मार्च पूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन महिन्याचा कालावधी लोटूनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर येत्या काळात निर्णय घेण्यात आला नाही तर या कर्मचाऱ्यासोबत येत्या अधिवेशनात आंदोलन करणार असल्याच्या इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये