महीला स्वावलंबी झाल्या पाहिजे… उपविभागीय अधिकारी मनीषा कदम
जागतिक महिला दिनानिमित्त रणरागिणी महिला मंडळाच्या वतीने विविध उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आपणही एक स्त्री म्हणून आपल्या मुलीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. तिच्या निर्णयाशी ती एखाद्या चुकीच्या गोष्टीला नाही म्हणत असेल तर आपणही तिला पाठिंबा दिला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंचं स्वप्न होतं मुलगी स्त्री ही शिक्षित असली पाहिजे त्यांना शिक्षित स्त्री कशासाठी पाहिजे होती जर महिला शिकली तर ती स्वावलंबी होऊ शकते आपण आजही दुसऱ्यांवर डिपेंड आहे म्हणजे स्त्री हि स्वावलंबी नाही करिता महिलांनी स्वावलंबी होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी दि 18रोजी जागतिक महीला दिनानिमित्त केले .
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रणरागिनी महिला मंडळाच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला तर महिलांच्या मनोरंजनासाठी कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कला साकारण्यात आल्या .दिनांक 18 मार्च रोजी महिला दिनानिमित्त रणरागिनी महिला मंडळाच्या वतीने स्थानिक अस्मिता लॉन्स येथे फक्त महिलांच्या कलांना वाव देण्यासाठी कलाविष्कार उपक्रम घेण्यात आला. यामध्ये सोलो डान्स लावणी एक पात्री नाटक गवळण अशा विविध कला महिलांनी सादर केल्या यामध्ये भव्य डान्स व फॅशन शो स्पर्धा करत
नृत्य प्रकार ” लावणी , गोंधळ, वेस्टर्न,गरबा साऊथ डान्स..असे अनेक प्रकार चे नृत्य प्रकार सादर केले ..
सोलो डान्स
प्रथम,संगिता मोगरकर
द्वितीय, प्रांजल घेवंदे
तृतीय, श्रुती पाटील
उत्तेजनार्थ, स्वाती अढाव
ग्रुप डान्स ….
प्रथम… दुर्गापूरा महिल देण्यात आला . यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, दैनिक देशोन्नतीच्या महिला पत्रकार सुषमा राऊत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नंदाताई कायंदे, वनपाल विद्या वाघ नगरपरिषदेच्या शिंगणे पर एडवोकेट अर्चना घेवंदे व यांचा सन्मान करण्यात आला तर शहरातील महिला मुख्याध्यापिका यांचा देखील सन्मान करण्यात आला. रणरागिनी महिला मंडळाच्या सौ सुनीता सवडे सौ संगीता मोगल सौ दीपमाला गोंमधरे सौ भाग्यश्री खेडेकर सौ अर्चना मस्के सौ जया डोईफोडे सौ प्रिया संत सौ रंजना रामाणे, सौ क्रांती पाटील सौ शितल खेडेकर होते. या उत्कृष्ट कार्यक्रमासाठी प्रास्ताविक सौ भाग्यश्री खेडेकर यांनी केले प्रास्ताविकामध्ये डॉक्टर भाग्यश्री यांनी आम्ही रणरागिनी महिला सर्व जाती-धर्माच्या आहोत तसेच सर्व पक्षाच्या आहोत मात्र महिला म्हणून रणरागिनी म्हणून शहरासाठी विविध उपक्रम घेत आहोत आमचे मतभेद हे राजकीय आहेत मात्र आम्ही रणरागिनी आपणा सर्वांसाठी हाकेला ओ देणारे आहोत ऐवढेच नाही तर आपल्या सुखदुःखात आम्ही आहोत असे सांगितले सूत्रसंचालन क्रांती पाटील व पांगारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ प्रिया संत यांनी केले असंख्य महीला उपस्थित होत्या त्यांच्या साठी आनंद मेळा खाऊ चौपाटी देखील प्रांगणात होती.