ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विविध स्पर्धांमध्ये सहभागी होवुन विद्यार्थ्यांनी सुप्त गुणांना वाव द्यावा – ठाणेदार प्रदीप पुल्लरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली : नकारार्थी विचार न करता सकारात्मक विचार डोळयासमोर ठेवून पुस्तकी ज्ञानासोबतचं बाहय वातावरणातील परिस्थितीचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी क्रिडा आणि सांस्कृतिक स्पर्धामध्यें सहभाग नोंदवून आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला पाहिजे. असे मत ठाणेदार प्रदिप पुल्लरवार यांनी केले.

स्थानिक भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालीत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावलीच्या वतीने आयोजीत युवा रंग 2025 च्या समारोप प्रसंगी ठाणेदार प्रदीप पुल्लरवार बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष अनिल स्वामी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या समारोपीय कार्यक्रमाला नायब तहसिलदार अनिकेत कांबळे, संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. विजय शेंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ए. चंद्रमौली, उपप्राचार्य प्रा. महानंदा भाकरे आदि उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठ गिताने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि संस्थाध्यक्ष स्व. वामनराव गड्डमवार यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले.

प्राचार्य डाॅ. ए. चंद्रमौली यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नायब तहसिलदार अनिकेत कांबळे यांनी अभ्यासक्रमातील पुस्तकांच्या अभ्यासासोबतचं विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन आणि स्पर्धा परिक्षांच्या पुस्तकांचेही वाचन केल्यास डोळयासमोर ठेवलेले ध्येय गाठण्यास अडचणींचा सामना करावा लागणार नाही. असा हितोपदेश केला तर संस्थेचे कोषाध्यक्ष डाॅ.विजय शेंडे यांनी सर्वसोयीने युक्त असलेल्या सदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेवून सोने करावे. असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे उपाध्यक्ष अनिल स्वामी यांनी पुर्वी शहरी भागातील विद्यार्थी क्रिडा आणि सांस्कृतिक स्पर्धामध्यें अव्वल ठरत होते अलीकडे मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा शहरी विद्यार्थ्यांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत आहेत. याची विद्यार्थ्यांनी नोंद घेतली पाहिजे. असे आवाहन केले.

कार्यक्रमा दरम्यान घेण्यांत आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम मानसी नायबनकर, द्वितीय पल्लवी तरारे आणि तृतिय नंदीनी भोयर, पुष्प सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राजक्ता बावणे, मानसी नायबनकर-द्वितीय आणि महीमा मोहुर्ले तृतिय, पोस्टर्स स्पर्धेत प्रथम-नंदीनी भोयर, द्वितीय-पायल गावतुरे, तृतिय-पल्लवी राऊत, मुलींच्या दौड स्पर्धेत प्रथम- टिंकल चिमुरकर, द्वितीय-प्राजक्ता पाल आणि तृतिय-किटी सेडमाके, मुलांच्या दौड स्पर्धेत प्रथम-गणेश सहारे, द्वितीय कुणाल मुट्टावार, तृतिय-नागेश कोरेवार, मुलींच्या भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक भाग्यश्री बोरकर, द्वितीय महिमा मोहुर्ले आणि तृतिय-स्वरा धानोरकर, मुलांच्या भालाफेक स्पर्धेत प्रथम-रोशन गोहणे, द्वितीय-कुणाल मुट्टावार आणि तृतिय-सुरज कोरडे, बुध्दीबळ स्पर्धेत ललीत गेडाम प्रथम तर प्रतिक्षा चौधरी द्वितीय आली. समुह नृत्य स्पर्धेत प्रथम बि.एस्सी प्रथम वर्षाचा तामील ग्रृप प्रथम, बि.ए.द्वितीय वर्गाचा सुरज कोरडे गृ्रप द्वितीय आणि एम.एस्सी द्वितीय वर्षाची नेहा डोंगरे गृ्रप तिस-या क्रमांकाची मानकरी ठरली. नृत्य स्पर्धेत सिमा वाटगुरे प्रथम, पायल पिंपळशेंडे द्वितीय आणि जया जराते तृतिय आली.

नाटीका सादरीकरणामध्ये बि.ए.प्रथम वर्गाचा शेतकरी ग्रृप अव्वल ठरला, युगल गितगायन स्पर्धेत केतन-भुषण प्रथम ठरले, आदि स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना बक्षिस आणि प्रमाणपञ व महाविद्यालयातील कल्याणी चौधरी, योगेश राजुरकर, कुणाल मुठ्ठावार, संध्या बावणे, अंकुश सोनुले आणि आसुरी चौधरी या होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण निधीमधुन मान्यवरांच्या हस्ते गणवेश वितरण करण्यांत आले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे परिक्षण डाॅ. अशोक खोबरागडे, प्रा. विनोद बडवाईक आणि डाॅ. राजश्री मार्कंडेवार यांनी केले. संचलन डाॅ. राम वासेकर आणि डाॅ. प्रेरणा मोडक यांनी तर प्रा. संगानंद बागडे यांनी आभार मानले. युवारंगचे यशस्वी आयोजना करीता राहुल बोबाटे आणि सहका-यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये