ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवेकानंद विद्यालयात जागतिक वन दिनानिमित्त मार्गदर्शन सत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती  येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयात २१ मार्च जागतिक वन दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर अंतर्गत वन परिक्षेत्र कार्यालय, भद्रावती यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.

या मार्गदर्शन सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना व्ही. बांदूरकर आणि प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी, पंस, भद्रावती तसेच, वन विभागातील अधिकारी वृंद के. डब्ल्यू. धानकुटे वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती., व्ही. व्ही. शिंदे, क्षेत्र सहायक भद्रावती., डी. एम. गेडाम, वनरक्षक भद्रावती., जे. एम. माहुलीकर, वनरक्षक, चिपराळा., एस. आर. कुळमेथे (न्यायालयीन विभाग) आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

वन संरक्षक डी. एम. गेडाम यांनी मानवी जीवनात वनांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वनपरिक्षेत्र अधिकारी के. डब्ल्यू. धानकुटे यांनी वृक्षारोपण व वृक्ष संगोपन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या देशात वनांचे क्षेत्र वाढविण्यासाठी वन विभाग व समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर आणि मुख्याध्यापिका कल्पना बांदूरकर यांनी सुद्धा उपस्थितांना प्रसंगोनुरूप मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तुकाराम पोफळे आणि आभार प्रदर्शन शिक्षक दयाकर मग्गीडवार यांनी केले.

या मार्गदर्शन सत्रास भद्रावती वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी, वनमजुर आणि विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक दयाकर मग्गीडवार, संजय आगलावे, तुकाराम पोफळे, शिक्षिका आशा गावंडे, निशा खंडाळकर, मेघा ताजने, शीतल जीवने, मीना डवरे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विनोद गावंडे, रामदास ठक, विश्वनाथ हरबडे, बंडू कांबळे, सीमा सावनकर, शुभांगी दैवलकर आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये