अखिल भारतीय प्रतिभा सम्मान महासंम्मेलन, अमरावती यांचे कडुन अपर पोलीस अधिक्षक, डॉ. दत्ताराम उध्दव राठोड यांना राष्ट्रगौरव पुरस्कार प्राप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
डॉ. दत्ताराम राठोड, अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपुर यांनी नौकरी करता करता एकुण २६ पदव्या प्राप्त केलेल्या आहेत.
तसेच यापुर्वी त्यांचे “मराठी व तेलगु भाषिक अनुबंध” हे पुस्तक नोव्हेंबर २०२३ मध्ये पायगुण प्रकाशन अमरावती यांचे मार्फतीने प्रकाशित करण्यात आले आहे. यापुवी सदर पुस्तक सन २०२४ मध्ये ग्लोबल गोल्ड टॅलेंट, बुक ऑफ रेकॉर्ड, नवी मुंबई यांच्या संस्थेमार्फत राष्ट्रीय टैलेंट पुरस्कार मिळालेला आहे.
यापुर्वी “मराठी व तेलगु भाषिक अनुबंध” या संशोधन ग्रंथाकरीता त्यांना दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी शब्दगंध साहोत्यिक परिषद, अहिल्यानगर, महाराष्ट्र राज्य यांचा २०२४ चा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार वितरण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
तसेच प्रशासन, शिक्षण, संशोधन आणि साहित्य लेखन या क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल अखिल भारतीय प्रतिभा सम्मान महासंम्मेलन, अमरावती यांचे कडुन राष्ट्रगौरव पुरस्कार २०२५ नुकताच जाहीर झाला आहे. त्याचा सोहळा हॉटेल रैलिश, कुबडे हाईट्स, राजकमल अंबादेवी रोड, अमरावती येथे दिनांक २३ मार्च २०२५ रोजी आयोजीत करण्यात आला असुन सदर संमेलनात त्यांना पुरस्कार वितरण व त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री प्रविण साळुंखे, अपर पोलीस महासंचालक, लोहमार्ग मुंबई व डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपुर यांनी खास अभिनंदन केले आहे.