आरोग्य सेवेच्या बळकटीकरणात आशा वर्कर प्रमुख घटक : डॉ. स्वप्नील टेंभे
गडचांदुरात आशा दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रत्येक गावात खेड्यापाड्यात आरोग्य सेवेची दूत म्हणून कार्य करणारी आशा वर्कर व आशा गट प्रवर्तक यांच्या सन्मानार्थ गौरवार्थ कोरपणा व जिवती तालुका आशा दिन गौरव कार्यक्रम हा गडचांदूर येथील बालाजी सभागृहात साजरा झाला. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे यांनी आरोग्य सेवेच्या बळकटीकरणात आशा वर्कर प्रमुख घटक आहे असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सवर्ग विकास अधिकारी जिवती श्री लक्ष्मीनारायणजी दोडके साहेब आकांशीत तालुका जिवतीचे समन्वयक श्री गणेश चिंत कुंटलवार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल टेंभे कोरपना व जिवती तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी,शहरी आरोग्यवर्धिनी चे वैद्यकीय अधिकारी तसेच मोबाईल मेडिकल युनिट चे वैद्यकीय अधिकारी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे कार्यक्रमात तालुक्यातील सातही प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्कृष्ट कार्य करणारा आशा वर्कर यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तदनंतर आशा गटप्रवर्तक व आशा वर्कर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्यामध्ये आदिवासी नृत्य सादर करणे,पारंपारिक नृत्य,लावणी असे अनेक पारंपारिक नृत्य सादर करण्यात आले त्याचप्रमाणे पथनाट्याच्या माध्यमातून आरोग्य विषयक संदेश दिले तसेच पोवाडे,शायरी याची या गायनाचा कार्यक्रम झाला यामध्ये आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्यातील सांस्कृतिक कला गुणांचे दर्शन झाले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा समूह संघटक कोरपणासंदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती नंदगिरीवार व सूत्रसंचालन श्रीमती निंदेकर व श्रीमती वानखडे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक दिनेश मोरे आशा समूह संघटक जिवती श्री राजेश भगत व सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.