रेती घाटातून अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक
ताब्यातून ओली रेतिसह एकूण जु कि 22 लाख 60 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 13/03/2025 रोजी स्था. गुन्हे शाखा वर्धा द्वारे पो. स्टे. हिंगणघाट हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबवित असताना गोपनीय माहितीच्या आधारे पो स्टे हिंगणघाट हद्दीत वना नदीतून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असते अश्या माहिती वरून सदर ठिकाणी पथकांनी रात्रभर दबा धरून बसुन छापा टाकला असता आरोपी :- 1) ट्रॅक्टर चालक-मालक शेर अली उर्फ सोनू सय्यद अली, वय 39 वर्ष, रा. आरमोस नगर, ता. हिंगणघाट, 2) ट्रॅक्टर चालक नितेश महादेव आकरे, वय 30 वर्ष, रा. माता मंदिर वार्ड, त. हिंगणघाट, 3) ट्रॅक्टर मालक शाहीद अब्दुल गफार शेख, रा. मोहता बगीचा हिंगणघाट, (पसार), 4) ट्रॅक्टर चालक आकाश विष्णूजी नानवटकर, वय 29 वर्ष, रा. संत तुकडोजी वार्ड,हिंगणघाट,5) ट्रॅक्टर मालक सुभाष सोयाम, रा. खंडोबा वार्ड, हिंगणघाट हे संगनमताने डकिंग रेती घाटातून अवैधरित्या रेती उत्खनन करून चोरी करतांना रंगेहाथ मिळून आले त्यांचे ताब्यातून जप्त माल वर्णन :-(1) 1) एक जुना वापरता हिरव्या रंगाचा जान डीर कंपनीचा क्रमांक एम.एच. 32 ए.एच. 9196 कि. 6,00,000 रू 2) एक लाल रंगाची ज्याचा क्रमांक एम.एच. 32 पी 435 ची ट्राली कि. 1,50,000 रू. 3) ट्रालीमध्ये अंदाजे 60 फुट रेती किं 3,000 रू (2) 1) एक जुना वापरता लाल रंगाचा महिंद्रा सरपंच कंपनीचा ट्रॅक्टर क्र. Mh 32 पी 3276, कि. 6,00,000 रू (2) एक लाल रंगाची विना क्रमांकाची ट्राली कि. 1,50,000 रू. 3) ट्रालीमध्ये अंदाजे 65 फुट रेती कि 3,500 रू.(3) 1) एक जुना वापरता लाल रंगाचा सोनालीका इंटरनॅषल बी.आय. 745 कंपनीचा ट्रॅक्टर क्र.mh 32A 7633, कि. 6,00,000 रू (2) एक लाल रंगाची विना क्रमांकाची ट्राली कि. 1,50,000 रू.3) ट्रालीमध्ये अंदाजे 80 फुट रेती किं 4,000 रू असा एकुण जु.कि. 22,60,500/- रू. चा मुद्देमाल हस्तगत केला. तिन्ही ट्रॅक्टर चालक- मालक आरोपीस सदरची रेती बाबत रॉयल्टी किवा परवाना आहे का? व रेती कुठून भरली? याबाबत विचारणा केली असता त्यांनी रेतीची रॉयल्टी नसुन हिंगणघाट वणा नदीचे डंकीन घाटातून काळी ओली रेती काढून सदरची रेती त्यांचे ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरली आहे, असे सांगितले. सदर ट्रॅक्टर चालक मालक आरोपी विरुध्द पो स्टे हिंगणघाट येथे कलम 303(2), भारतीय न्याय संहिता 2023 कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
सदर कारवाइ मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात – श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनीष कांबळे, पो.अ. अमोल नगराळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे, दीपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.