राजेश येसेकार यांना समाज भुषण पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणी येथे नुकताच शेतकरी मंदिर येथे नाभिक समाजाचा उपवधू वर परिचय मेळावा आयोजीत करण्यात आला होता मेळाव्यात यावेळी राजेश येसेकर यांना पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ नेहमीच समाज कार्यात चांगल्या संकल्पनांना वर्षानुवर्षे प्रोत्साहित करीत आहे. नवसंकल्पना आणि उमेदिने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजातील जेष्ठांच्या व तरुणांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ तर्फे पुरस्कार देण्यात येतात. राजेश येसेकर यांच्या जिवनातील समाज कार्याची दखल घेऊन मा. कल्याणजी दळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष यांच्या हस्ते यांना समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमातचे अध्यक्ष म्हणुन कल्याणजी दळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राजेंद्र भाऊ नागपुरे यांच्या हस्ते झाले .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गजाननराव वाघमारे अमरावती विभागीय अध्यक्ष व निवृत्ती पिस्तूलकर सर व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रमाचे यशस्वीते करीता शशिकांत उर्फ गुड्डू नक्षणे महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष व त्यांची संपूर्ण टीमने सहकार्य केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी सर्वश्री डुडुभाऊ नक्षीणे, दिलिपभाऊ वानकर, दिपकभाऊ नक्षिणे, रविंद्र येसेकर, सचिन नक्षिणे, हरीश घुमे, हणुमान नक्षिणे, सागर घुमे, पियुष घुमे, पांडुरग हणुमंते, बंडु व्ही लांडगे, नितिन नागमोते, होमराज घुमे शेगाव, अभिजीत आसरे, स्मिता आसरे पुणे, विजयराव आसरे, कविताताई आसरे नागपुर, लता येसेकर, कल्पना क्षिरसागार, चंद्रकांत येसेकर, मिणाताई येसेकर, निळकंठराव तायडे नेर,तुषार डहाके दारव्हा, व सर्व समाज बांधव यांनी अभिनंदन करुन पुढिल कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.