ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने सभा व सत्कार समारंभाचे आयोजन

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय व निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन व निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सभा व सत्कार समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. नंदकिशोर खत्री, यंग टीचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, संघटनेचे मार्गदर्शक व कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप घोरपडे, डॉ. विवेक शिंदे, अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती तथा सिनेट सदस्य, संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, श्री संदीपभाऊ गड्डमवार, श्री नंदू भाऊ खनके, डॉ.कार्तिक शिंदे, सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, डॉक्टर विशाल शिंदे, सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्राचार्य डॉक्टर राजेश इंगोले महाविद्यालयाचे प्राचार्य व आयोजक डॉक्टर एल. एस. लडके, गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, संघटनेचे सचिव डॉ. विवेक गोरलावार मंचावर उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात थोर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला मालॅर्पण करून तसेच पाहुण्यांच्या स्वागताने झाली.

सर्वप्रथम गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय गोरे यांनी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन व निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या वतीने संघटनेचे पदाधिकारी,विभाग समन्वयक यांची सभा व मान्यवरांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमा मागचा हेतू तसेच स्पष्ट केला.

यावेळी सभेचे मार्गदर्शक व संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप घोरपडे यांनी विद्यापरिषद,सिनेट, आणि व्यवस्थापन परिषदेमध्ये कार्यरत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करावे व संघटनेची विकासात्मक भूमिका विशद करावी असे प्रतिपादन केले.

यावेळी सभेचे आयोजक व भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष व सिनेट सदस्य डॉ.विवेक शिंदे यांनी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे कार्य प्रगतीशील असल्याचे सांगून संस्था, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. बबनराव तायडे यांनी यंग टीचर्स संघटनेचा इतिहास सांगून शिक्षकांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्याकरिता संघर्ष करून कार्य करणारी संघटना असल्याचे सांगून ही संघटना गोंडवाना विद्यापीठातील सर्व शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन डॉ. तायवाडे यांनी यावेळी केले.

तसेच या सभा व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर खत्री यांनी संघटनेने अविरत शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करावे व आम्ही आपल्या सदैव पाठीशी आहोत असे अभिवचन दिले.

तसेच याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन मधील पदाधिकारी असलेले आणि गोंडवाना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त करणारे डॉ. विवेक शिंदे (सीनेट), डॉ. सतीश कन्नाके(एनसीसी), डॉ. संजय साबळे (ग्रंथालय), डॉ.शरद बिलोरकर( राष्ट्रीय सेवा योजना) यांचा संघटनेच्या वतीने शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच गोंडवाना विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल डॉ. खत्री महाविद्यालय, चंद्रपूर चे प्राचार्य डॉक्टर जनार्धन काकडे व गोंडवाना विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती चे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य पदी नियुक्त झाल्याबद्दल डॉ. जनार्दन काकडे, डॉक्टर रवींद्रनाथ केवट यांचा संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच डॉ. विशाल मालेकर,डॉ. संतोष डाखरे डॉ. अनिस खान,डॉ. नितीन कत्रोजवार ,डॉ. संदीप सातव डॉ. बिना मून, डॉ. चेतन वानखेडे या प्राध्यापकांची संघटनेच्या विभागीय समन्वय पदी निवड करण्यात येऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या सभा व सत्कार समारंभाचे संचालन संघटनेचे सचिव डॉ. विवेक गोरलावर तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी केले.

या सभा व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाकरिता गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये