ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन आर्वी हद्दीतील अवैध हातभट्टी दारु विक्रेत्याविरुध्द एमपिडीए कायदयांतर्गत नागपुर कारागृहात स्थानबध्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन आर्यों, अंतर्गत मौजा सावळापूर परिसरात अवैधरित्या हातभट्टीची गावठी मोहा फुलापासून निमर्मात दारु विक्री करणारा हरीश नंदकिशोर मेश्राम, रा. सावळापुर, ता. आवी जि. वर्धा वाचेविरुध्द पोलीस स्टेशन आवी, जि. वर्धा येथे सन २०१६ ते २०२४ पावेतो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ एकुण ३४ गुन्हे दाखल आहेत. स्थानबध्द ईसमाविरुध्द वेळोवेळी प्रचलीत कायदयान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सदरहू स्वानबध्द हा न जुमानता अवैधरीत्या गावठी मोहा फुलाच्या हातभट्टीची दारु मोठ्या प्रमाणात निमीती करुन तिची किरकोळ विक्रेत्यांना दारुची तस्करी करुन तिची आवी शहरामध्ये विक्री करण्या करीता तस्करी करीत होता, ज्यामुळे आयी परिसरातील सार्वजनीक स्वास्थास धोका निर्माण होवून सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती. तसेच पोलीस स्टेशन आवी परिक्षेत्रातील सावळापुर, आधी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महपी लोकांचा जनसामान्यांना तसेच महीला मुलीना खूप त्रास वाढत चालला होता.

ठाणे प्रभारी अधिकारी पोनी यशवंती सोलसे, यांनी एमपिडीए कायदयान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना सादर केला होता. त्याअनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांनी दिनांक ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

आगामी सार्वत्रीक विधानसभा निवडणुका २०२४ लक्षात घेता विधानसभा निवडणुका निर्भीड, प्रलोभन मुक्त व शांतता पुर्ण वातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर एमपिडीए कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा तसेच मा. पोलीस अधिक्षक वर्धा यांनी दिलेले आहेत. सन २०२४ साली आज पावेतो एकूण १५ दारु विक्रते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर एम.पि.डी.ए. कायदयांर्तगत अशा प्रकारची कठोर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हयातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशती मध्ये आहे.

सदर प्रकरणी मा. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक, डॉ. श्री. सागर कवडे, श्री, डि.एस. खंडेराव, एस. डिपि. आवी उप विभाग, पोनी/विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, पोनी यशवंत सोलसे, पोलीस निरीक्षक, पोस्टे आर्वी, सपोनी वाघोडे, सफी संतोष दुरगुडे, गिरीष कोरडे, पोहवा अमोल आत्राम, महादेव सानप, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पोलीस अंमलदार/विनोद मस्के, इमरान खिलची पोस्टे आयी यांचे पथकाने केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये