ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री साई कॉन्व्हेंट सी.बी.एस.ई चे खेळाडू रग्बी बॉल स्पर्धेत विभागीय स्तरावर

१७ वर्षा आतील मुला-मुलींच्या संघाचा समावेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व्दारा आयोजित जिल्हा स्तरिय रग्बी बॉल स्पर्धेत स्थानिक श्री साई कॉन्व्हेंट सी.बी. एस.ई च्या खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.

     येथील तालुका क्रिडा संकुलन येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा स्तरीय रग्बी बॉल स्पर्धेत १७ वर्षों आतील मुलींच्या संघात वर्ग ८ ची खेळाडू कु .शरवरी मेश्राम ,अलीना कुमरे, सेजल बिपटे,वर्ग ७ ची खेळाडू उन्नती

 रायपुर, प्रणाली बदखल, मृणमयी सनदोकर,रीया मत्ते,सृष्टी मेश्राम,चेतना क्षीरसागर, का व्या कोथळे, प्रांजली पिंजारकर, विधिशा सिडाम या मुंलींचा तर १७ वर्षा आतील मुलांच्या संघात वर्ग ८चा खेळाडू आरव बेसेकर,हसनेन कुरेशी, वर्ग ९ चा खेळाडू तेजस अलोने, अंशुल पेटकर, साईनाथ महाकुलकर, संविधान उराडे शालमोन निमगडे, हर्षे चौधरी अनुज चौधरी, रोहित तेवर, दक्ष पुनवटकर,मानस पारखी,या खेळाडूंची रग्बी बॉल स्पर्धेकरिता विभागीय स्तरावर निवड झाली असून हे खेळाडू विभागीय स्तरावर चंद्रपूर जिल्हाचे नेतृत्व करणार आहे या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे मुख्याध्यापक अतुल बडकेलवार अलोका बिश्वास,वर्ग शिक्षक आणि आई वडिलांना दिले आहे.

या खेळाडूंची संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कांताताई गुंडावार, सचिव प्रा.अतुल गुंडावार रूपा गुंडावार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील खेळाकरीता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये