ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त यंग चांदा ब्रिगेडतर्फे दीक्षाभूमी येथे पुरी-भाजी वाटप

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दीक्षाभूमीवर अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीला अभिवादन करतात. या अनुयायांच्या सेवेत यंग चांदा ब्रिगेडने पुरी-भाजीचे वाटप केले.

यावेळी दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांना सन्मानपूर्वक सेवा देण्यासाठी ब्रिगेडच्या सदस्यांनी एकत्र येऊन व्यवस्था सांभाळली. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुमारे 10,000 हून अधिक जनसमूहाला पुरी-भाजीचे वाटप करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला बहुजन आघाडी शहर प्रमूख विमल कातकर, निलिमा वनकर, सायली येरणे, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सयद अबरार, माधूरी निवलकर, दत्तू गवळी यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये