ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्पर ताब्यात

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर असे की, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब यांना मिळाल्या गोपनीय माहितीवरून तसेच त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात व हजेरीत पंच व पोस्टे स्टाफसह ऋषिराज ढाब्याच्या समोर नाकाबंदी करून दोन टिप्पर संशयितरित्या येताना दिसले त्यांना ताब्यात घेऊन पाहणी केली असता.,

1.टिप्पर क्रमांक एम एच 40 एन 4300 सदर टिप्पर मध्ये अंदाजे साडेतीन ब्रास रेती किंमत 17500/-रुपये तसेच 2. टिप्पर क्रमांक एम एच 29 टी 1360 यामध्ये अंदाजे साडेतीन ब्रास रेती एकूण किंमत 17500/- अवैधरीत्या मिळून आली. 1) टिप्पर क्रमांक एम एच 29 टी 1360 मधील अंदाजित साडेतीन ब्रास रेती किंमत 17500 व टिप्पर ची किंमत 15 लाख रुपये एकूण 1517500/- रुपये 2) टिप्पर क्रमांक एम एच 40 एन 4300 मधील रेतीची किंमत 17500 व टिप्परची अंदाजे किंमत 1500000/- असे एकूण 15 17500 रुपये चा मुद्देमाल तसेच एकूण मुद्देमाल ची किंमत 30,35,000/- हजार रुपयांचा मुद्देमाल मोकाजपती पंचनाप्रमाणे जप्त केला.

दोन्ही टिप्पर चालक च्या मदतीने दोन्ही टिप्पर चा मालक याने अवैद्य रित्या विनापरवाना रेती गौण खनिज संगनमताने चोरी करून वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी 1) लक्ष्मण प्रताप सिंह बैस रा. नाचणगाव ता. देवळी जि. वर्धा 2) सुरेंद्र शामरावजी खंदाते रा.विटाळा ता. धामणगाव जि. अमरावती 3) टिप्पर क्रमांक एम एच 29 टी 1360 व एम एच 40 एन 4300 चे मालक विरुद्ध गुन्हा नोंद केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये