वृक्ष लागवड व वृक्ष भेट देऊन साजरा केला चौदावी कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका स्वर्गवासी संध्याताई विठ्ठलराव थिपे यांचे यांचे दिनांक 21 एप्रिल 2025 ला दुःखद निधन झाले, चौदावी निमित्ताने गडचांदूर येथे त्यांच्या घरा समोर असलेल्या पटांगणात आदरांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, समाजात पिढ्यानपिढ्या रुढी प्रथा परंपरेला न जुमानता एक नाविन्य उपक्रम या माध्यमातून विठ्ठलराव थिपे यांनी या कार्यक्रमाचे माध्यमातून एक समाजाला प्रबोधनात्मक चालना दिली आहे.
या चौदावीच्या कार्यक्रमाप्रसंगी सकाळी 11 वाजता वृक्ष लागवड स्वर्गवासी संध्या ताई यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षांची लागवड त्यांच्या घरासमोरील ओपन प्लेस मध्ये करण्यात आली, त्यानंतर कुमारी योगिता काळे समाजसेविका सास्ती यांचे प्रबोधन पाहुण्यांना करण्यात आले व तसेच आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना एक वृक्ष भेट म्हणून स्मुर्ती प्रित्यर्थ देण्यात आले. स्वर्गवासी संध्या विठ्ठलराव थिपे यांना वृक्षांबद्दल आवड होती त्या स्वतः शिक्षिका असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सुद्धा त्यांनी केली,शिक्षणाची आवड सुद्धा त्यांना होती.
लग्न झाल्यावर त्यांनी डीएड पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि प्राणी मात्रावर प्रेम, दया, माया या सर्व गोष्टीं त्यांच्या स्वभावात भरलेल्या होत्या म्हणून त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी या दृष्टिकोनातून एक नवीन उपक्रम समाजात सुरू करण्याचं काम त्यांचे पती श्री विठ्ठलराव थिपे यांनी केलेले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर होते. प्रमुख पाहुने म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब मोहितकर, मराठा सेवा संघाचे नेते हरिश्चंद्र थिपे, सेवानिवृत्त प्राचार्य गिरीधरराव बोबडे उपस्थित होते.
प्रविण चिकनकर यांनी या स्तुत्य उपक्रम चे कौतुक केले.
कार्यक्रमांचे संचालन गिरीधर पांनघाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ मुग्धा चिकंनकर यांनी मानले, याप्रसंगी लखमापुर व गडचांदूर येथील नागरीक उपस्थित होते,