Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बिबी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप

माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबीच्या वतीने गावातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात माझी वसुंधरा योजनेची जनजागृती करणाऱ्या स्कूल बॅग व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये नोटबुक, ड्रॉइंग बुक, कंपास, कलर बॉक्स, पेन, पेन्सिल बॉक्स इ. वस्तूचा समावेश आहे.

     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी टेकाम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच आशिष देरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच पंचायत समितीचे माजी सभापती साईनाथ कुळमेथे, ग्रामपंचायत अधिकारी धनराज डुकरे, बापूजी पिंपळकर व मुख्याध्यापक अनंत रासेकर उपस्थित होते.

        उपसरपंच आशिष देरकर यांनी गावात अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थी प्रेरित होतात असे सांगितले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्राप्त झाल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

       कार्यक्रमाचे संचालन रिया शेख हिने केले तर आभार मामीलवाड सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व शाळा व्यवस्थापन समितीने सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये