४ मार्च ‘लाईनमन दिन’ महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत विविध कार्यालयात साजरा

चांदा ब्लास्ट
राज्यात व देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविणाऱ्या व जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचविणाऱ्या- वीज यंत्रणेत अदृश्य असलेल्या ‘विजेला’ सुरळीत ठेवण्यासाठी विजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी, अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीजक्षेत्रात महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून देशभरात तदवतच महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलातील सर्व २९ उपविभागात साजरा करण्यात आला.
मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे यांनी सर्वांना लाईनमॅन दिनाच्या शुभेच्छा देत समृद्धीचे,विकासाचे,नाते प्रकाशाचे, ग्राहक समाधान हेच ध्येय महावितरणचे’ अशा शब्दांनी सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वांना वीज सुरक्षेची शपथ देण्यात आली.”महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहात ! जनमित्र हे ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास वर्षाचे ३६५ दिवस अविरत सेवा देतात.कधी,चंद्रपूरच्या कडकडते उन्ह अंगावर झेलत तर पुरात पोहून जात, धो- धो पावसात कर्तव्य पार पाडतात.चंद्रपूर जिल्ह्याच्या रानावनात, गडचिरोली जिल्हा यासारख्या दुर्गमातिदुर्गम -आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत महावितरण ‘आधारस्तंभ ‘-जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवीतात याचा मला सार्थ अभिमान आहे. आपले जीवनमान काळजी घ्या व दुरुस्ती कामात सुरक्षेशी तडजोड करू नका.कारण तुमची वाट घरी तुमचा परिवार पाहत असतो तर, महावितरण साठी, महावितरणचा तुम्ही महत्वाचा ‘दुवा’आहात”,असे ते म्हणाले.
मुख्य अभियंता यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले व केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना,महावितरण पी.डी. ग्राहकांसाठी अभय योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना,सोलर रूप टॉप इत्यादी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार लक्ष पूर्ण करण्याचे आवाहन केले. श्रीमती संध्या चिवंडे,अधीक्षक अभियंता चंद्रपूर प्रविभाग यांनी लाईनमन दिनानिमित्त लाईनमन दिवसाच्या सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व नवनवीत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अभियंते यांना निर्देश देऊन चंद्रपूर मंडळातर्गत वीज बिल वसुलीचे लक्ष्य गाठण्याकरिता मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास श्री.चंद्रशेखर दाव्हेकर, कार्यकारी अभियंता चंद्रपूर विभाग, श्री विकास शहाडे कार्यकारी अभियंता (प्रशासन) श्री सुशील विखार सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.स.) (प्रभारी) चंद्रपूर परिमंडळ, श्री राकेश बोरिवार, वरीष्ठ व्यवस्थापक (विवले) चंद्रपूर मंडळ हे उपस्थित होते. लाईनमन दिनानिमित्त तांत्रिक कर्मचारी प्रेमानंद खंडाळे, सरोजिनी लोखंडे, राहुल डांगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जनसंपर्क अधिकारी, महावितरण, चंद्रपूर