ताज्या घडामोडी

फूस लावून पळवून नेलेल्या मुलीचा सावंगी पोलीसांनी शोध घेवून आरोपीस केली अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर असे की, पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे वयोवृध्द महिला रा. पालोती यांनी तकार दाखल केली होती की त्यांची अल्पवयीन नात ही दि. 01/03/2025 रोजी घरी झोपून असताना झोपे दरम्यान फिर्यादी यांना जाग आली त्यावेळी त्यांना झोपून असलेली अल्पवयीन नात ही दिसली नाही. त्यामुळे त्यांनी इतरत्र ठिकाणी शोध घेतला, मिळून न आल्याने त्यांनी पो.स्टे. सावंगी मेघे येथे त्याच रोजी तकार दाखल केली. त्यावरून पो.स्टे ला अप. क. 186/2025 कलम 137 (2) बीएनएस अन्वयेचा गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा. ठाणेदार साहेब यांनी लागलीच मुलीचे शोधार्थ वेगवेगळे पथक तयार करण्यात आले असता त्यांन माहिती प्राप्त झाली की नमुद अल्पवयीन मुलीस अनुप श्रवण कुडमते रा. वडद ता.जि. वर्धा याने फुस लावून पळवून नेलेले आहे. या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या पथकाने शोध घेवून मिळालेलया माहितीच्या आधारे कळंब जि. यवतमाळ येथून आरोपी व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेवून पो.स्टे सावंगी मेघे येथे आनण्यात आले. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय शारीरीक तपासणी करण्यात आली. तसेच नमुद आरोपी यास अटक करून तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री संदिप कापडे सा. ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि देरकर, पोउपनि खोब्रागडे, पोउपनि दुधाने व ईतर पो.स्टाफ यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि देरकर है करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये