ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी केंद्रातूनच खते,बियाणे खरेदी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

गैरप्रकार आढळल्यास त्वरित तक्रार करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

 गैरप्रकार आढळल्यास त्वरित तक्रार करा

कोरपना : चालू वर्षातील २०२५ -२६ खरीप पिकांसाठी तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांनी खात, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी शासन मान्यता कृषी निविष्ठाचा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच खरेदी करावे असे आवाहन पंचायत समिती कोरपना चे कृषी अधिकारी विवेक दुधे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

बोगस व बेकायदेशीर बियाणे म्हणजे काय ज्या बियाण्याच्या उत्पादनास व विक्रीस शासनाची परवानगी नसते, विद्याण्याच्या उत्पन्नासंबंधी मनघडण व खोटे दावे करून आमीष दाखविण्यात येते, बियाण्याच्या व्यवहारांमध्ये शासनमान्य गराचे अधिकृत बिल शेतकन्यास दिले जात नाही, बियाण्याच्या पाकिटावर वियाण्याच्या गुणवत्तेचा तपशील व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो, अनाधिकृत बियाणे वापरामुळे जर शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाई चे हमी शासन व ग्राहक मंच सुद्धा घेऊ शकत नाही असे बियाणे बोगस व बेकायदेशीर असते.

शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. यासाठी पक्क्या बिलाच्या आग्रह धरावा. विक्रेता पक्के बिल देण्यास नकार देत असल्यास किंवा इतर कुठलीही शंका तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी, किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून तक्रार नोंदवावी. बिलावर खरेदी केलेल्या वियाण्याच्या गुणवतेचा संपूर्ण तपशील नोंदविलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे पॉकीट सीलबंद, मोहरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी.

बियाण्याच्या उगवणक्षमतेचा अंतिम मुदतीचा दिनांक पाहूनच पॉफीट किवा बैंग खरेदी करावी. एमआरपी पेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्यास त्वरित कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी. रासायनिक खत खरेदी करताना बॅग वरील एमआरपी किमत बघूनच खरेदी करावी. जर कोणताही व्यक्ती अथवा संस्था बेकायदेशीर पद्धतीने बोगस बियाण्याची, खताची विक्री करताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध बियाणे नियंत्रण आदेश 1983 रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल.

अशी बोगस बियाणे व खते विक्री होत असल्याची बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी अधिकारी पंचायत समिती कोरपना यांनी शेतकरी बंधुना आवाहन केले आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये