ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सहा.पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांची समुद्रपूर पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध रेती घाटावर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 2 मार्च 2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग पुलगाव राहुल चव्हाण यांना मुखबीर व्दारे माहिती मिळाली की गिरड मार्गाने समुद्रपूर कडे मोठ मोठ्या ट्रक मध्ये रेतीची चोरटी वाहतूक केली जाणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी नाकाबंदी करून दोन पंचांना बोलावून घेतले पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे नाकाबंदी लावली असता गिरड करून एका मागे एक ट्रक येताना दिसले

सदरचे ट्रक थांबवून विचारपूस केली असता त्यांनी वाहनांमध्ये रेती असल्याचे सांगितले ट्रकची ताडपत्री खोलून पाहणी केली असता वरील सर्व वाहनात गौण खनिज तांबडी व पांढरी रेती असल्याचे दिसून आल्याने त्यांना राॅलटी बाबत विचारपूस केली असता राॅलटी नसल्याचे सांगितले.

सदरची रेतीचा भंडार घेऊन वाहन मालकाच्या सांगण्यावरून भरून आणल्याचे सांगितले यावरून पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला अपराध क्रमांक 139/25 कलम 303 (2) 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 3(1) /181,130 ,177 मोवाका सहकलम 48 (7) 48 (8) महसूल अधिनियम फिर्यादी नाव व पत्ता शाखेतर्फे अनिल दरेकर पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन समुद्रपूर गुन्हा व घटना तारीख व वेळ दिनांक 2 मार्च 2025 ते 07.07 वाजता ते 08.00 वाजता गुन्हा दाखल व वेळ दिनांक 2 मार्च 2025 वेळ 14.04 वाजता माहिती कशी प्राप्त झाली रात्र गस्त पेट्रोलींग दरम्यान मुखबीर व्दारे गोपनीय माहिती मिळाली असता.,

आरोपी नामे,(1)शेख रशीद शेख हबीब राहणार हबीब नगर अमरावती तहसील जिल्हा अमरावती (2)मनिल जंगु धुर्वे राहणार कसाईपुरा अमरावती तह जिल्हा अमरावती (3) जुबेर खान राहणार अमरावती पसार (4) अतुल अशोक भगत राहणार हुसनापूर तह देवळी जिल्हा वर्धा (5)निकेश सुखदेव मेश्राम राहणार कारला चौक तह जिल्हा वर्धा (6)प्रतिम अशोक ऊईके राहणार सेलडोह तह सेलू जिल्हा वर्धा (7) पंकज भोलाजी मडावी राहणार सेलडोह तह सेलू जिल्हा वर्धा (8)बल्लू उर्फ इर्शाद पठाण राहणार वर्धा पसार (9)शेख नसीम शेख रफीक राहणार ताजनगर तह जिल्हा अमरावती (10)मौसीन खान राहणार वर्धा पसार (11) शैलेश चंद्रकांत शेंद्रे राहणार तिगांव तह जिल्हा वर्धा (12) तुषार रमेश सोनटक्के राहणार सेलडोह तह सेलू जिल्हा वर्धा (13) अजझर खान राहणार वर्धा पसार (14) शेख रुबेज शेख अजिज राहणार स्टेशनफैल तह जिल्हा वर्धा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर ची ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पुलगाव समुद्रपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रवींद्र रेवतकर पोलिस उपनिरीक्षक अनिल दरेकर पोलिस शिपाई रामदास दराडे पोलिस शिपाई शुभम कावडे यांनी आरोपी कडून 60 ब्रास रेती किंमत 3,00000/- रुपये 6 ट्रक व टिप्पर किंमत 1,47,00000./- रुपये असा एकुण 1,50,00000/- असा एकुण दिड करोड रुपयांचा रेतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये