ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसुविधासाठी महावितरण कार्यालय विरुद्ध जय शिवसंग्राम संघटना आक्रमक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यात व शहरात वारंवार विद्युत खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे सध्या मुस्लिम समाजाचे पवित्र महिना रमजान सुरू झाला आहे, महावितरण कार्यालयातुन वारंवार विद्युत खंडित होत आहे यामुळे तालुक्यातील व शहरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

महावितरण कार्यालय विरुद्ध नागरिकांचा रोष निर्माण होत आहे सध्या सर्व कामे ऑनलाईन सुरू असल्याने शेतकऱ्यांना व नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच पवित्र महिना रमजान सुरू झाले असून मुस्लिम समाजामध्ये सुद्धा रोष निर्माण होत आहे, तरी महावितरण कार्यालयाने तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा महावितरण कार्यालय विरुद्ध जय शिवसंग्राम संघटना आक्रमक भूमिका घेईल असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष जहीरखान, शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, राजू गव्हाणे, अनिस शहा, आदिल शेख, संतोष हिवाळे, सुरेश निकाळजे, साजिद खान, किशोर वाघ, असलम खान, दीपक मोगरकर, राजेश भाग्यवंत आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये