राजस्थानचे राज्यपाल मा हरिभाऊ बागडे यांचा देऊळगाव राजा येथे सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाशीवरात्रीच्या शुभ पर्वावर सकाळी 10.00वाजता माऊली पेट्रोलियम कुंभारी परीसर देऊळगावराजा येथे राजस्थानचे महामहीम राज्यपाल तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष मा.हरीभाऊजी बागडे नाना यांनी सदीच्छा भेट दिली.असता पेट्रोलपंपाचे संचालक श्री.ज्ञानेश्वर शेजूळ ऊर्फ बाळुभाऊ व अनिल भाऊ शेजूळ(भाजपा नेते संभाजी नगर) यांनी त्यांचा यथोच्च सत्कार केला.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गणेश मान्टे (भाजपा जि.अध्यक्ष बुलढाणा),दिपक बोरकर(शिवसेना उपजिल्हाप्रमुख/ सुभाष दराडे बुलढाणा,भाजपचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशोकराव चव्हाण (जालना),निशिकांत भावसार राजेश भुतडा, एकनाथ जाधव ,प्रमोद नरोडे,संजू भाऊ आढाव,शंकरशेठ चौधरी, कृष्णा पाचरणे, अविनाश खांडेभराड, गौरव वायाळ, संदिप झोरे,अंनद लाड, बाळूभाऊंचे मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.मा.राज्यपाल महोदयानी आपल्या भाषणातून बाळू भाऊनी केलेल्या उत्तूंगभरारी बाबत प्रकाश टाकला,शेजूळ कुटूंब आणी माझे फार जिव्हाळ्याचे संबध आहेत असा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला व शुभेच्छा दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एकनाथ जाधव यांनी केले.