ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अखिल कुणबी महासंघाच्या चंद्रपूर-यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख पदी नूतन लेडांगे यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अखिल कुणबी महासंघाचे कार्य संपूर्ण देशात मजबूत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल कुणबी महासंघाच्या चंद्रपूर व यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख पदावर शहरातील गुरुनगर येथील रहिवासी नूतन तात्याजी लेडांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नूतन लेडांगे यांच्या या नियुक्तीमुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील अखिल कुणबी महासंघाचे कार्य विस्तारून संघ अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.लेडांगे यांच्या या नियुक्तीमुळे शहरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.