ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्सवात साजरी    

आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बस स्टॅन्ड चौक देऊळगाव राजा येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची 286 वी जयंती बंजारा समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . जयंती उत्सवा दरम्यान बंजारा समाजाच्या रूढी परंपरेनुसार नुसार संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भोग( नैवेद्य) देण्यात आला याप्रसंगी शहरातील राजकीय तथा सामाजिक व्यक्तींनी संत सेवालाल महाराजांना फुल अर्पण करून आदरांजली वाहिली.

         त्यानंतर नवीनच उभारण्यात आलेल्या हरित हरितक्रांतीचे प्रणेनेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याचे माननीय आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ खांडेभराड, भाजपचे नेते डॉक्टर सुनील कायंदे, नगरपरिषद माजी नगरसेवक प्रदीप वाघ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सदाशिव मुंडे, आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी संत सेवालाल महाराज यांना आदरांजली वाहिली, नंतर संत सेवालाल महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली

          संत सेवालाल महाराज जयंती निमित्त बंजारा समाजातील देऊळगाव राजा येथील समाज बांधवांनी आणि तालुका जाफराबाद बुटखेड तांडा अकोला आणि वाढोणा तांडा नांदखेडा तांडा येथील युवकांनी सहभाग घेतला, संत सेवालाल महाराज जयंती उत्सव पार पाडण्यासाठी एस के चव्हाण,शंकर राठोड,रमेश राठोड, श्रीराम राठोड, गजानन राठोड, संजय चव्हाण,दशरथ राठोड, याव्यतिरिक्त इतर समाज बांधवांनी परिश्रम घेतले

         जयंती उत्सवा दरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये