ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती-देऊळवाडा-माजरी मार्गावरील घन- कचरा प्रकल्प परिसरात वाघाची भीती

नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिला सावध राहण्याचा इशारा - वनविभागाला दिली माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

               भद्रावती नगरपरिषद प्रशासनाचा घनकचरा प्रकल्प भद्रावती देऊळवाडा रोडवर असून या परिसरात वाघ फिरताना दिसत आहेत.

  वायकोली माजरी परिसरातील चारगाव व कुरोडा देऊळवाडा, कुनाडा, चारगाव या भागात खळबळ माजवल्यानंतर आता वाघाने भद्रावती नगरपरिषद प्रशासनाच्या विजासन भद्रावती-देऊळवाडा रस्त्यावरील घनकचरा प्रकल्पाकडे मोर्चा वळवला आहे.

  भद्रावती नगरपरिषद प्रशासनाने भद्रावती वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने परिसराला भेट देऊन वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याचा निर्णय घेतला. या दोन दिवसांत येथे पिंजरे लावण्यात येणार आहेत.

 नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी शहरातील विंजासन, केसुर्ली व कुरोडा, देऊळवाडा, कुनाडा, चारगाव माजरी कोंढाडी या गावातील नागरिकांनी तसेच या रस्त्यावरून जाणाऱ्या वायकोली कर्मचाऱ्यांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी व रात्रीच्या वेळी या परिसरात एकटे फिरू नये, असे आवाहन केले आहे. .

  चारगाव परिसरात तीन वाघ असल्याचे वनविभागाचे म्हणणे असून दोन वाघ असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी चारगाव परिसरात हाहाकार माजवल्यानंतर कुरोडा परिसरात ही वाघीण आढळून आली होती. परंतु, शहरातील विजासन परिसरात असलेल्या पालिकेच्या घनकचरा विल्हेवाटीच्या प्रकल्पामागे रात्री वाघ दिसल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 घन कचरा प्रकल्प हा विजासन डोंगराळ भागात आहे आणि मागील भाग घनदाट जंगलाने वेढलेला आहे, ज्यामुळे तो वाघांचा अधिवास बनला आहे.

  या रस्त्यावरील ग्रामस्थ व वेकोलि कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस होणारी ये-जा लोकांच्या चिंतेचा विषय बनला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये