ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशवंतराव शिंदे विद्यालय येथे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी येथील शाळेत शैक्षणिक सत्र 2024 -25 वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक डॉ.सुधीर मोते हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री ए.एम. देशमुख,उमेश पाटील,शबाना सय्यद मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुहास कोल्हे यांनी केले.श्री ए. एम.देशमुख सर यांनी प्रश्नपत्रिका विषय तसेच परीक्षेला सामोरे कसे जायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले,तर अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्याध्यापक डॉ.सुधीर मोते यांनी विद्यार्थ्यांना शंभर टक्के कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षेला कसे सामोरे जायचे याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कुमारी वेदिका शेंडे,प्रकाश उमरे,आदिती शेरेकर या विद्यार्थ्यांनी अत्यंत भावुक मनाने आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमा प्रसंगी सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाकरिता सतीश नंदनवार , विजय लांबट रवींद्र बनकर यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी जाणू टेकाम हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी कल्याणी शेलोकर हिने मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये