ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट येथे सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरमधील जुगारावर कार्यवाही

एकूण १ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०९/०२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक पो.स्टे. हिंगणघाट परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या खात्रीशिर खबरेवरून, आठवडी बाजार, हिंगणघाट येथील रॉयल व्हिडीओ गेम पार्लरचा मालक नसिम शहाबुद्दीन शेख रा. हिंगणघाट हा त्याचे व्हिडीओ गेम पार्लरमधील ईलेक्ट्रॉनीक मशिनवर तेथे येणाऱ्या ग्राहकांकडुन नगदी पैशाच्या स्वरूपात रक्कम स्विकारून त्या मोबदल्यात त्यांना तेवढ्या रकमेची ईलेक्ट्रॉनीक मशिनवर चाबी भरून दिल्यानंतर त्या ईलेक्ट्रॉनीक मशिनवर येणाऱ्या फिरत्या आकडयांवर स्वतःचे फायदयाकरीता पैशाची पैज लावून हारजितचा जुगार खेळवत आहे. अशा गुप्त माहितीवरून जुगार रेड करणेकामी ०२ पंचासह छापा टाकला असता रॉयल व्हिडीओ गेम पार्लर दुकानाचा मालक नसिम उर्फ नस्सु शहाबुद्दीन शेख, वय ४२ वर्ष, रा. जगन्नाथ वार्ड, हिंगणघाट, हा जागीच मिळुन आला त्याचे व्हिडीओ गेम पार्लरची पाहणी केली असता, ०९ इलेक्ट्रॉनीक मशिन चालु स्थितीत सुरू दिसुन आल्या, मशिन हया २०४३२ इंच आकाराच्या प्लाऊडच्या तयार केलेल्या असुन, सदर मशिनवर समोरील भागात काचाचा एक रंगी बेरंगी स्किन असुन, त्यावर इंग्रजीमध्ये मध्यभागी १ ते ८ अशा अंकाचे दोन चक आहेत. मशिनचे खालच्या बाजुस १ ते ८ असे अंक नमुद असुन त्या खाली व साईडला सुध्दा बटन आहेत.

तसेच मशिनचे स्किनवरील वरच्या भागात १०,१५, २०, २५, ३०, ५००, १००० या प्रमाणे भाव लिहीलेले आहेत. आकडयाचे बटन दावल्यानंतर स्किनवरील आकड्यांचे चक फिरून थांवल्यानंतर ते दोन्ही चकातील प्रत्येकी एक-एक आकड्यावरून हार-जितची रक्कम भावाप्रमाणे निश्चित होवून ती रक्कम ग्राहक किंवा दुकानदार यांचेकडे मशिनवर दर्शविल्या जाते. त्याप्रमाणे ग्राहक व दुकानदार हे आपसामध्ये हार-जितच्या पैशाची देवाण-घेवाण करतात. सदर व्हिडीओ गेम पार्लरचा चालक व मालक शेख नसिम उर्फ नस्सु यास व्हिडीओ गेम पार्लरचे परवानाबाबत विचारणा केली असता, त्याने त्याचेकडे मशिनचा परवाना नसल्याची माहिती दिली.

त्यावरून मालक शेख नसिम उर्फ नस्सु हा त्याचे आर्थीक फायदयाकरीता ईलेक्ट्रानिक मशिनव्दारे जुगार चालवित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे ताब्यातुन १) व्हिडीओ गेम पार्लर मधील ०९ इलेक्ट्रॉनीक मशिन त्यांचे चाव्यांसह (ज्यात गोल्डण वेल, वाल, हॉलीडे, वॉटसअप, विंग, फ्रंट लाईन, एम २८, मास्टर, सिक्स लायनर या कंपनीचे नाव असलेल्या मशिन आहे.) प्रती मशिन किंमत १३,००० रू. प्रमाणे एकुण कि. १,१७,०००/- रू. २) प्लॉस्टीक पेअर ०३ नग प्रती ५०० रू. प्रमाणे १,५००/- रु. ३) प्लास्टीक स्टुल ०६, प्रति नंग ३०० रु प्रमाणे किंमत १,८००/-४) एक टेबल किंमत १,०००/- रू १५) नगदी जुगाराचे १,५०० रूप्ये असा एकुण कि. १,२२,८००/- रू चा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे त्याचेविरूध्द कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कार्यवाही श्री. अनुराग जैन साहेव, पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उप निरीक्षक राहुल इटेकार, पो. अंमलदार गजानन लामसे, रवि पुरोहीत, मंगेश आदे, दिपक साठे, विनोद कापसे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये