ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कत्तल खाण्याच्या बंदीसाठी आ. करण देवतळे यांच्यासह विविध कार्यालयात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    गेल्या बऱ्याच दिवसांपासून शहरातील डोलारा परिसरात गोवंश कत्तलखाना सुरू आहे. गोवंश हे हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असल्यामुळे कत्तलखान्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जात आहे. त्यामुळे सदर कत्तलखाना बंद करून दोषींवर कारवाई करावी.

यासाठी विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलातर्फे आमदार करण देवतळे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. याशिवाय तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन तथा इतर संबंधित कार्यालयातही निवेदन सादर करण्यात आले आहे.

कत्तलखान्यावर त्वरित कारवाई न केल्यास या विरोधात मोर्चा काढण्याचा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलाचे पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये