महिलेने स्वतः चे मुलीला घेत विहिरीत उडी मारून मुलीचा घेतला जीव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
यातील फिर्यादी आणि आरोपी मृत महिला हे पती पत्नी असून बलीत मृत मुलगी दीड वर्षाची ही त्यांची मुलगी आहे. ते कुटुंब मेंढया सांभाळण्याचा व्यवसाय करतात. ते मूळ यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. ते घटना घडलेल्या गावी मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आले होते.
घटनेच्या दिवशी त्यांनी मेंढ्या चारून आणल्या नंतर त्यांना जाळी मध्ये कोंडणे होते, परंतु काही मेंढ्या शेजारी शेत असलेल्या पिकाकडे गेल्याने मृतक यांचे पती यांनी मृतक यांना त्या घेऊन यायला सांगितले. परंतु मृतक जात नसल्याने पती यांनी गालावर एक थापड मारून जायला सांगितले, त्यामुळे मृतक महिला ही तिचे दीड वर्षांच्या मुलीला घेऊन मेंढ्या आणायला गेली आणि मुलीसह तेथील वरघणे या शेतकरी यांचे शेतातील विहिरीत स्वतः चा मुलीसह उडी मारून मुलीचा देखील जीव घेतला आहे. मृत आरोपी महिला आणि मृत बलित मुलगी यांना गावातील लोकांचे मदत विहिरीचे बाहेर काढण्यात आले होते.
मृतक महिला हीचे माहेरील नातेवाईक आई, भाऊ, इतर नातेवाईक आले होते. त्यांचे कडे करण्यात आलेल्या चौकशी मध्ये, त्यांची कोणतेही तक्रार नसल्याचे सांगितले आहे. मृत आरोपी महिला आणि मुलगी यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, शांतता आहे.
मृत आरोपी महिला हिने सोबत स्वतः चे मुलीला घेऊन विहिरीत उडी मारून मुलीचा जीव घेतला म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.