गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या मोटार सायकलने गावठी मोहा दारूची वाहतूक

अडुसष्ट हजारावर माल जप्त ; दोन आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि. 21/06/23 चे 12.15 वा. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा द्वारे पो. स्टे. तळेगाव शा.प. हद्दीत मिळालेल्या माहितीवरून तळेगाव येथे आष्टी टि पॉईंट ते तळेगाव सर्व्हिस रोडवर नाकेबंदी करून नमूद आरोपीतांवर प्रो रेड केला असता आरोपी हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलने गावठी मोहा दारूची वाहतूक करित असताना मिळून आल्याने एक जुनी वापरती होंडा शाईन मोटार सायकल क्र. MH-32-AG- 9094 किंमत 60,000 रू.  एक मोठया काळ्या रंगाच्या रबरी ट्यूबमध्ये 50 लिटर गावठी मोहा दारू प्रती लिटर 150 रू. प्रमाणे कि. 7500/- रू रबरी ट्यूब किंमत 500 रु.  मुद्देमाल आरोपीतांचे ताब्यातुन वाहनासह 68,000 रु. चा मुद्देमाल अवैध्यरित्या मिळून आल्याने मोक्का जप्ती पचनामा प्रमाणे जप्त करून आरोपी 1) नरेश डोमाजी राऊत, वय 40 वर्ष, रा. वॉर्ड न. 6 तळेगाव शा.प. 2) सुनील भिमरावजी नेहारे, वय 35 वर्ष, रा. वॉर्ड न. 5, तळेगाव शा.प. यास अटक करून कलम 65(अ)(ई) म.दा.का. सहकलम 3(1)181, 130/177 मो.वा.का. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मनोज धात्रक, संजय बोगा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये