सव्वा तीन किलो गांजासह आरोपी अटकेत – 1,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
दुचाकीने व्हायची अंमली पदार्थाची वाहतूक

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
राजुरा पोलिसांच्या डी बी पथकाने मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळीच शहरातील सोनिया नगर परिसरात मोठी कारवाई करून सव्वा तीन किलो गांजा सह आरोपीला अटक केली.
डी बी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सोनिया नगर वार्ड येथिल गणपत उर्फ गणप्या वसंत बावनकर हा 30 वर्षीय युवक मागील काही काळापासून शहरात गांजाची अवैध तस्करी व गांजाची विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली. प्रकरणाची टीप मिळताच ठाणेदार विशाल नागरगोजे ह्यांच्या मार्गदर्शनात, डी बी पथक प्रमुख सपोनी धर्मेंद्र जोशी ह्यांच्या नेतृत्वात डी बी चमूने सोनिया नगर येथे सकाळी 8:00 वाजताच्या सुमारास नियोजनबध्द धाड घालुन गणपत बावनकर ह्याचे घरी धाड घातली असता त्याच्या ॲक्टिव्हा दुचाकीच्या डिकीत 30000/- रुपये किमतीचा तिन किलो दोनशे नव्वद ग्रॅम गांजा आढळुन आला.
डी बी चमुने आरोपीला तत्काळ जेरबंद करून 70000/- रुपये किंमतीच्या ॲक्टीव्हा दुचाकीसह 30,000/- रुपयांचा गांजा असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध एन डी पी एस कायद्याच्या कलम 8 व कलम 20 अन्वये गुन्ह्याची नोंद केली असुन पुढील तपास सुरू आहे. सदर यशस्वी कारवाई बद्दल ठाणेदार विशाल नागरगोजे ह्यांचेसह डी बी पथक प्रमुख सपोनी धर्मेंद्र जोशी व त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.