बोरगाव मेघे येथे सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर 02 ठिकाणी छापा
एकूण 1 लाख 46 हजाराचा माल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 27/03/2025 रोजी स्था. गुन्हे शाखा वर्धा द्वारे पो. स्टे. वर्धा हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबवित असताना गोपनीय माहिती मिळाली की, बोरगाव मध्ये ग्रामपंचायत परिसरात 02 ठिकाणी संगणकावर ऑनलाईन पद्धतीने आकड्यांचा जुगार सुरू आहे अश्या माहितीवरून पंच व पोस्टाफ सह दोन्ही ठिकाणी छापा घातला असता ग्राहक पोलीस पाहून पसार झाले, आरोपी 1)रवींद्र मधुकराव दरवरे वय 52 वर्ष, रा.बोरगाव मेघे, जि. वर्धा, 2)मनोहर भैयालाल चंदनमाथे वय 62 वर्ष, रा.बोरगाव मेघे, जि. वर्धा हे जागीच मिळून आले, त्यांना ऑनलाईन जुगारबाबत विचारणा केली असता त्यांनी साथीदार 3) सतीश सरपटे पाटील रा. शेगाव (पसार).4) राजू वाहने रा. अमरावती (पसार, 5) पिंटू ठाकूर रा. शेगाव (पसार), यांचेसह दोन्ही ठिकाणी संगणमताने गोल्डन व राजश्री या नावाच्या ॲप वर ऑनलाईन आकड्यांचा जुगार लावून लोकांना जास्त पैशाची आमिष दाखवून स्वतःचे फायदा करिता आकड्यांचा ऑनलाईन जुगार संगणकावर खेळवतो अशी माहिती दिल्याने त्यांचे ताब्यातून दोन्ही जागेवरून **जप्त मुद्देमाल 1) 03 संगणक, 2) 03 प्रिंटर, 3) 03 स्कॅनर , 4) 03 की बोर्ड, 5) 02 सीसीटीव्ही DVR, 6) 02 इंटरनेट राऊटर, 7) लॉटरी च्या चिठ्ठ्या व कागदाचे रोल, 8) खुर्च्या 9) टेबल, 10) स्टूल,11) 03 माऊस 12) नगदी 12,890 रुपये असा एकूण जुमला किंमत 1,46,890 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. ऑनलाइन जुगार मालक यांना परवाना बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही शासकीय परवाना नाही असे सांगितले. त्यावरून सदर ऑनलाइन जुगार खेळणारे इसमाविरुद्ध पो स्टे वर्धा येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला.
सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात – श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो उप नि बालाजी लालपालवाले, पो उप नि अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, सचिन इंगोले, शेखर डोंगरे, प्रमोद पिसे, भुषण निघोट रितेश शर्मा, पो.अ. अमोल नगराळे, सुगम चौधरी, विकास मुंढे, गोपाल बावनकर, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.