ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसी बचाव परिषदेतील ठरावांचा शासनाकडे पाठपुरावा करणार

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले डॉ. अशोक जीवतोडे यांना आश्वासन

चांदा ब्लास्ट

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे नुकतीच भेट घेऊन चंद्रपुरात पार पडलेल्या ओबीसी बचाव परिषदेतील महत्त्वपूर्ण ठरावाची प्रत सादर केली. यावेळी बावनकुळे यांनी ओबीसी बचाव परिषदेतील विविध समाजातील प्रतिनिधींनी एकत्र येऊन घेतलेल्या ठरावांबाबतची अधिक माहिती जाणून घेतली, यासंदर्भात राज्य शासनाकडे आपण यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे सांगून शासन योग्य निर्णय घेतील, असे आश्वासन बावनकुळे यांनी जीवतोडे यांना दिले.

याप्रसंगी डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासह ओबीसी बचाव परिषदेचे पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन यावेळी चर्चा करण्यात आली.
ओबीसी परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजातील शेकडो जात संघटनांनी वज्रमूठ बांधल्याची माहितीही यावेळी जीवतोडे यांनी बावनकुळे यांना दिली.

चंद्रपूरमध्ये ओबीसी परिषद घेण्यात आली. या परिषदेमध्ये विविध जातींतील प्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी ओबीसीसंदर्भात विविध ठराव घेण्यात आले. या ठरावाची प्रत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करण्यात आली. या ठरावांबाबत विशेष लक्ष देण्याची मागणी केली.

-डॉ. अशोक जीवतोडे, विदर्भवादी ओबीसी नेते

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ओबीसी ठरावाची प्रत सादर करताना डॉ. अशोक जीवतोडे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये