ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुदृढ आरोग्यासाठी रोज धावणे गरजेचे आहे – प्रा.नितेश कराळे

फिनिक्स अकॅडमी, वर्धा यांच्या विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा यशस्वी आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा, २५ जानेवारी: फिनिक्स अकॅडमी, वर्धा यांच्या वतीने २५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मेजर डॉ. श्रीकांत कांदे (मिलिटरी हॉस्पिटल, पुलगाव), बिपिन मोघे (कारगिल योद्धा), शंकर गोडे, राहुल चांदुरकर, राजाभाऊ ताकसांडे (संचालक सेंट पॉन स्कूल नागपूर ) श्रीकांत भगत, सचिन सोनुने, अरविंद तायडे, किरण झाडे, व पुष्कर बंडावार यांच्या उपस्थितीत झाले.

या स्पर्धेत विदर्भातील २,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या मोह मायेत गेलेल्या विद्यार्थांना बाहेर काढण्यासाठी क्रीडा स्पर्धांना चालना देण्याची अत्यंत गरज होती. त्यामुळे कराळे सरांनी त्याबाबत पाऊल उचलत विद्यार्थ्यांना क्रीडा खेळांची आवड निर्माण व्हावी आणि मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांना पुन्हा चांगल्या निरोगी व सदृढ आरोग्यासाठी त्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेला अपेक्षेपेक्षा प्रचंड जास्त प्रतिसाद भेटला आणि 41000 च्या बक्षीस सोबत ट्रॉफी,मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.

या स्पर्धेमध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती ,चांदुर रेल्वे, बुलढाणा अशा अनेक ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यामुळे ही स्पर्धा खरोखर विदर्भ स्तरावर आयोजीत करण्यात आली होती. अशा लोकांच्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या.

विजेते गट:

१६ वर्षांखालील मुलं (३ किमी):

प्रथम क्रमांक: प्रदमुण्य कोपते

द्वितीय क्रमांक: आदित्य नागेश्वर

तृतीय क्रमांक: आदित्य मरकी

१६ वर्षांखालील मुली:

प्रथम क्रमांक: ईश्वर कालमेघ

द्वितीय क्रमांक: यशस्वी राठोड

तृतीय क्रमांक: नंदिनी सावरकर

१६ वर्षांवरील खुला प्रवर्ग (मुलं):

प्रथम क्रमांक: रोहित पटले

द्वितीय क्रमांक: आदेश चव्हाण

तृतीय क्रमांक: राजी फुसाटे

१६ वर्षांवरील खुला प्रवर्ग (मुली):

प्रथम क्रमांक: सलोनी लव्हाळे

द्वितीय क्रमांक: सेजल चौधरी

तृतीय क्रमांक: प्रीती घटोळे

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फिनिक्स अकॅडमीच्या सर्व सदस्यांनी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. आयोजक अतुल लेंडे, मोहित सहारे, वैभव होटे, रुपेश दंडारे, गोविंद पारीसे, रोशन वंदिले, श्रीतिज कराळे, सागर चौधरी, प्रज्वल गोटे,सम्यक रामटेके, पवन असुटकर, शुभम निसार, सुयोग ठमके, आणि अमर चिप्पावर यांचे विशेष योगदान लाभले.

कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर उपस्थित मान्यवरांनी स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले. विदर्भातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या उपक्रमामुळे फिटनेसचे महत्त्व अधोरेखित झाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये