ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाला “करिअर कट्टा”अंतर्गत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र राज्य उच्चतंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कॅरियर कट्टा” स्पर्धा 2024- 25 मध्ये शहरातील निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाला उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालयाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांना उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक, प्रा. डा. अपर्णा धोटे यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक तसेच प्रा. डॉ.जुमडे यांना उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाविद्यालयाला सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राध्यापक वृंद तथा सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.