Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

           शैक्षणिक सत्र २०२४ – २५ या चालू सत्रात विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सौ.प्रा.रोशनी कार्तिक शिंदे मॅडम, अध्यक्ष मुख्याध्यापक डॉ. सुधीर मोते, प्रमुख पाहुणे मा. सौ. मयुरी विशाल शिंदे मॅडम, आत्माराम देशमुख सर, सांस्कृतिक प्रमुख कु. अनुष्का राजभर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केली. पाहुण्यांनी नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे पाहुण्यांनी आवाहन केले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालकवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रजनी डाखरे व कु. जानू टेकाम यांनी केले तर पाहुण्यांचे आभार शबाना सय्यद मॅडम यांनी मानले.सांस्कुतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यालयीन शिक्षक सर्वश्री, यु. एस. पाटील, आर. एल. बनकर, एस. ए. कोल्हे, एस. जी. नंदनवार, व्ही. एस. लांबट यांनी परीश्रम घेतले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये