डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारणाला नव्हे तर धम्माला महत्व दिले – डॉ.राजरत्न आंबेडकर मुंबई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतिक अर्थतज्ञ आहेत. त्यांच्या रुपयाची समस्या या ग्रंथावर भारताची रिझर्व बँक उभी आहे. ते उत्तम राजकारणी संसद पटू होते. तें ब्रिटिशांच्या काळात त्यांच्याकडे सहा विभागाचे मंत्री होते. ते राजकारणासोबतच समाजकारण, प्रसिद्ध विधीतज्ञ म्हणून जगात प्रसिद्ध होते. त्यांनी कधीही स्वतःसाठी तडजोडीचे राजकारण केले नाही. ते आयुष्यात कधीही कोणालाही शरण गेले नाही. ते केवळ बुद्धाला शरण गेले. त्यांनी धर्मांतराची घोषणा केली तर लोकांनी विरोध केला ही वेळ धर्मांतराची नाही भारतात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत अशावेळी धर्मांतर करणे योग्य नाही परंतु महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले मला शेवटी बुद्धांना शरण जायचे आहे. विज्ञानावर, मानवतेवर आधारित असणाऱ्या बुद्ध धम्माचा मला स्वीकार करायचा आहे. जो धम्म भारतातून नष्ट झाला होता.
त्या धम्माला पुनर्जीवित करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.जगाच्या पाठीवर बुद्ध धम्म भारतातून गेला जो धम्म जगात सर्वश्रेष्ठ आहे त्या बुद्धाच्या धम्माला मला जवळ करायचे आहे. माझ्या 14 ऑक्टोबर 1956 च्या धम्मदीक्षा सोहळ्याला लोकांचा प्रचंड विरोध आहे धम्मदीक्षेला लोक नाही आले तरी चालतील कोणीच नाही आलं तर आम्ही दोघेच धम्मदीक्षा घेऊ परंतु धम्मदीक्षेच्या सोहळ्यापासून कदापिही हटनार नाही असा संकल्प करून पूर्णत्वास नेला . त्याच धम्मदीक्षा सोहळ्याला सात लाखापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारणाला नव्हे तर धम्माला महत्व दिले असे विचार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू डॉ राजरत्न आंबेडकर यांनी भदंत डॉ. राजरत्न यांनी आयोजित केलेल्या 38व्या बौद्ध धम्म परिषदेत धम्मप्रिय अशोक सम्राट नगरी (अंबानगर ) सेवाग्राम रोड येथे 19 जानेवारीला आयोजित बौद्ध धम्म परिषदेत व्यक्त केले. धम्म परिषदेचे अध्यक्ष भदंत चंद्रमुनी महाथेरो ब्रह्मदेश होते.
तर अतिथी म्हणून भदंत आनंद आग्रा, प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत, लेखक डॉ. लक्ष्मण यादव दिल्ली, महाड डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे सचिव विकास गायकवाड, युवा उद्योजक सुशांत मोरे, शिक्षण महर्षी अनाथपिंडक अनिल कुमार जवादे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष विशाल मानकर, सुहास थुल , नीरज ताकसांडे, आयुक्त स्वप्निल वालदे, स्वागताध्यक्ष प्राचार्य देवराव गजभिये, गौतम पाटील, आनंद सोनटक्के, किशोर खैरकर, आशिष सोनटक्के, प्रसिद्ध चित्रकार प्रशील पाटील, चित्रपट निर्माता चरण हरले,प्रा. रंजना ढाकने, भदंत नंद, भदंत शांतिप्रिय मुंबई भदंत संघरत्न मुंबई, बुद्धिस्ट मॅरेजचे विवेक मेश्राम, मेघराज रंगारी, दिनेश वाणी, विनोद बनसोड उपस्थित होते.
प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत, लेखक जे. एन. यु. चे माजी प्राध्यापक डॉ. लक्ष्मण यादव यांनी आज तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज केवळ भारत देशाला नाहीतर जगाला आहे. जग या दोघांनाही जवळ करत आहे. त्याच महामानवाला मानवतेच्या संदेश देणाऱ्या ज्ञानसूर्य युगप्रवर्तकाला भारतातील लोक स्थान देण्याचा प्रयत्न करत नाही. हे दोन्ही महामानव जगातले चमकणारे स्वयंप्रकाशित तारे आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नसते तर आज माझ्यासारखा ओ.बी.सी.चा मुलगा जे.एन.यु सारख्या विद्यापीठात प्राध्यापक होऊ शकला नसता असे विचार डॉ. लक्ष्मण यादव यांनी व्यक्त केले. धम्म परिषदेचे उद्घाटन शिक्षण महर्षी अनाथपिंडक अनिल कुमार जवादे यांनी केले. अनिल कुमार जवादे यांनी ज्ञानाचे केंद्र असणारे शिक्षण व्यवस्था आज धोक्यात आहे. भारतात चांगल्या मंदिराची नाही तर चांगल्या विद्यालयाची गरज आहे.
आज सर्वसामान्याचे शिक्षण धोक्यात आलेले आहे नवीन शिक्षा निती ही कौशल्य विकासाच्या नावावर मनुस्मृतीवर आधारित आहे जातीवर आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण केल्या जात आहे हे सर्वांसाठी धोक्याचे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रमणी महाथेरो यांनी बुद्धाची मानवतावादी शिकवणचं देशांना तारू शकते असे विचार व्यक्त केले. धम्मपरिषदेमध्ये भदंत आनंद महाथेरो आग्रा. भदंत शांतीप्रिय मुंबई, भदंत संघरत्न मुंबई एडवोकेट मोहोड यवतमाळ, मुख्याध्यापक मुकुंद नाखले,भीमा शंभरकर, प्राचार्य देवराव गजभिये यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील ढाले प्रास्ताविक धम्म परिषदेच्या आयोजक भदंत डॉ. राजरत्न यांनी तर आभार प्रा. शैलेंद्र निकोसे यांनी मानले. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक कुणाल वराळे, अनुष्का शीकतोडे, श्रावणी महाजन यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. बुद्ध गीत गीतांचा कार्यक्रमाचे संचालन प्रनोंज बनकर यांनी तर आभार गौतम पाटील यांनी मानले.
यशस्वी साठी सुजाता लोहकरे, ऍडव्होकेट वर्षा थूल. सुनिता खडककर, एडवोकेट ज्योती कोमलकर,पंचशीला बोरकर,प्रा. अर्चना नाखले, चंद्रकांता मानकर, सावित्री नाखले, हरिका ढाले वंदना पाटील, प्रीती मानकर, नीता लोखंडे सुशीला भगत, ममता निकोसे,अंकिता कांबळे,रुपाली वाणी, योगीता रंगारी, शीला,मुन डॉ. सोनिया ताकसांडे, छाया पानतावणे अंबानगर येथील युवकांनी सहकार्य केले. धम्म परिषदेला पंचवीस हजार धम्म बांधव उपस्थित होते. धम्मपालन गाथेंने धम्म परिषदेचा समारोप करण्यात आला