स्लग बेशिस्त वाहन धारकांना वाहतुक पोलिसांचा कडक इशारा
कायदे मोडणार्या बेशिस्त वाहन चालकांवर धडक कार्रवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अँकर वर्धा वाहतुक शाखेच्यावतीने बेशिस्त वाहन चालविणारे वाहनाला र्ककश हॉर्न, सायलेंसर लावणार्या वाहन चालकांविरुध्द वर्धा शहर वाहतुक शाखेच्यावतीने धडक कार्रवाई चालू करण्यात आली असून या अंतर्गत अनेक वाहन धारकांवर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक सतिश डेहनकर यांच्या नेतृत्वात धडक कार्रवाई करण्यात येत आहे. आज वाहतुक शाखेच्यावतीने मोडीफाय सायलेंसर करुन वाहन चालविणार्यांविरुध्द कार्रवाई करण्यात आली असून ५० मोडिफाय सायलेंसर आज बजाज चौकात रोलरच्या साहाय्याने जप्त करण्यात आलेले सायलेंसर नष्ट करण्यात आले. वाहन धारकांनी असे सायलेंसर लाऊ नये, असे आवाहन वाहतुक शाखेच्यावतीने करण्यात आले.
वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षकसतिश डेहनकर यांनी केले आहे. वर्धा शहरात अशा वाहन धारकांवर कार्रवाई करण्यात येत असून ही कार्रवाई पोलिस सतिश डेहनकर, पोलिस कर्मचारी चंदू खोंडे, रियाज खान, आरिफ खान, कय्यूम शेख, दिलीप कामठी, गिरीष वाटखेडे, शिल्पा पिसुड्डे, ज्योत्सना मेश्राम, सह वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी करीत आहे.