Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

हनुमान नगर येथे रामधून वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     हनुमान नगर भद्रावती येथे रामधून वर्धापन दिनानिमित्त दिनांक १८ जानेवारी व १९जानेवारी २०२५ ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक १८ जानेवारी २०२५ रोज शनिवारला घटस्थापना व द्वीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल याप्रसंगी ह.भ.प.दिवसे महाराज व मधुकररावजी धाबेकर यांची उपस्थिती राहील. त्यानंतर सामुदायिक ध्यान होईल ध्यानावर गजानन डंभारे यांचे चिंतन होईल. दुपारी १ वाजता आदर्श बाल गुरुदेव भजन मंडळ भद्रावती यांचे भजनाचा कार्यक्रम होईल, सायं. ठीक ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेवर ह.भ.प. ओमप्रकाश पांडे महाराज यांचे चिंतन होईल व रात्रौ.८ वाजता ह.भ.प.लक्ष्मीबाई सिडाम यांच्या भारुडाचा कार्यक्रम होईल त्यानंतर जनजागृती भजन मंडळ हनुमान नगर यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल.

दिनांक १९ जानेवारी रोज रविवारला काळे साहेब यांचे सामुदायिक ध्यानावर चिंतन होईल त्यानंतर भव्य पालखी सोहळा कार्यक्रम होईल याप्रसंगी विवेक महाकाळकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी सौ.उर्मिलाताई बोंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभेल. त्यानंतर दुपारी ठीक १.०० वाजता ह.भ.प.आशिष माणूसमारे महाराज यांच्या गोपालकाल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम होईल.

याप्रसंगी करणदादा देवतळे आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र उपस्थित राहतील त्यानंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल या सर्व कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा अशी आवाहन रामधून वर्धापन दिन सोहळा समिती चे वतीने करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये