Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

लोकमान्य विद्यालयात नगर परिषदेतर्फे प्रश्न मंजुषा स्पर्धा

823 स्पर्धकांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

  शासनाच्या हर घर संविधान उपक्रम व स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत भद्रावती नगर परिषदेतर्फे शहरातील लोकमान्य विद्यालयात दिनांक दहा रोज शुक्रवारला शहरातील विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान व राज्यघटना या विषयांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत शहरातील विविध वयोगटातील 823 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून सदर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये