Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावती तहसीलचे तहसीलदार कोण?

राजेश भांडारकर की अनिकेत सोनवणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      अवैद्य रेती वाहतूक प्रकरणात पकडलेल्या ट्रॅक्टर मालकास दिलेल्या पत्र आणि नोटीस मध्ये या तहसीलचे तहसीलदार राजेश भांडारकर की अनिकेत सोनवणे ?असा संभ्रम नागरिकात निर्माण झाला आहे.

    दि.७ जानेवारीला रात्रौ ९ वाजता सुमठाणा येथे वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर मंडळ अधिकारी घोडपेठ आणि त्यांच्या पथकाकडून घोट-निंबाळा येथील रोशन रामटेके यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ एन ९३३२ तर ट्रॉली क्रमांक एमएच ३४ सीजे ५१२८ असा आहे. या प्रकरणात तहसीलदार राजेश भांडारकर यांनी झालेल्या कारवाईचे सूचना पत्र दि.७ जानेवारीला पत्र क्रमांक २०२५/१७ नुसार ट्रॅक्टर मालक रोशन रामटेके यांस दिले तर नोटीस हा आदल्या दिवशी म्हणजे ६ जानेवारीला घटना घडण्याच्या आधीच कोर्ट विद्यमान श्री अनिकेत सोनवणे तहसीलदार भद्रावती यांचे न्यायालय या पत्रकावर तहसीलदार राजेश भांडारकर यांनी आपल्या स्वाक्षरीने पत्र क्रमांक २०२५/१८ नुसार दिले. या दोन्ही पत्रामुळे नागरिकांना संभ्रम निर्माण झाला. या तहसीलचे तहसीलदार नेमके भांडारकर की सोनवणे?

    दिव्यदृष्टी लाभलेले तहसीलदार राजेश भांडारकर घटना घडण्याचे आधीच म्हणजे दि. ७ जानेवारीला अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले असता.दि.६ जानेवारीला म्हणजे एक दिवस आधीच या क्रमांकाचे ट्रॅक्टर,ट्रॅक्टर मालकाचे नाव, पकडण्याचे ठिकाण, कोणत्या मंडळ अधिकारी पकडनार आहे.याची इतंभुत माहिती त्यांना आधी कळलीच कशी, याचा अर्थ तहसीलदार भांडारकर यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली असावी असा निघतो.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये