Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

गौवंशने भरलेला ट्रक पोलिसांनी केला जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

7 जानेवारी रोजी कोरपना हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरद्वारे खबर मिळाली असता मौजा वनसडी कोरपना मार्ग निजामाबादकडे गौवशिय जनावरे कतल्लीकरीता ट्रक क्रमांक MH 40 CD 0178 या वाहनामध्ये जनावरांना निर्दयतेने कोढुंन एकमेकांना दोरीने गड्याजवळ व तोंडाला घट्ट बांधून कत्तली करिता घेऊन जात आहे अशा खात्रीशीर खबरीवरून मिळाली असता शासकीय वाहनाने कोरपना गावाजवळील चटक आश्रम शाळा येथे पोहोचून आश्रम शाळा आदीलाबाद रोडवर नाकाबंदी करीत असताना अंदाजे4.30 दरम्यान मौजा कोरपना गावाकडून ट्रक क्रमांक MH 40 CD 0178 ट्रक येताना दिसल्याने त्यावर संशय आल्याने ट्रक थांबला व त्यांना नाव गाव विचारले असता वाहन चालकाने आपले नाव वहिद रहीम शेख वय 58 धंदा ड्रायव्हर राहणार खैरी पोस्ट पिंपळगाव तालुका लाखनी जिल्हा भंडारा व कबीर कादिर शेख वय 34 धंदा मजुरी येणार घड्याळ तालुका पवनी जिल्हा भंडारा एजाज खान अयुब खान वय 32 वर्षे माधुरी राहणार पवनी भौतला जिल्हा भंडारा असे पोलिसांना सांगितले तेव्हा ट्रक क्रमांकMH 40 CD 0178 वाहनाची पचासमक्ष पाहणी केली असता सर्व जनावरांचे यांची एकत्रित अंदाजे किंमत3,15,000 रु असलेल्या गोवशिय जनावरे निर्दयतेने कडून एकमेकांना पायाला दोरीने गड्याजवळ व तोंडाला घट्ट बांधून दिसले तेव्हा हे जनावरे कुठे घेऊन जात आहे असे वाहनचालकाच विचारले असता त्यांनी निजामाबाद तेलंगणा राज्य येथे कतलीकरिता घेऊन जात आहे असे सांगितले.

तसेच त्यांना जनावरांचे खरेदीचे दाखले व वैद्यकीय प्रमाणपत्र विचारले असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे मिळून आलेले नाही सदरचे ट्रक चालकास जनावरांचे मालक कोण आहे असे विचारणा केली असता त्यांनी जावेद अख्तर पठाण असे सांगितले व तो माझ्या मागे डीझायर गाडीने मागे येत आहे असे सांगितल्यावर गाडी क्रमांकMH 34 BR 0693 ही गाडी थांबवुन नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव प्रवीण झावरू देवगडे वय 39 वर्ष राहणार भद्रावती जिल्हा चंद्रपूर व जावेद अख्तर पठाण रा, मल्हारी बाबा सोसायटी भद्रावती तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर असे सांगितले व सदर ट्रक मधील असलेले गोवंश जनावरे माझीच असल्याचे सांगितले तरी सदर वर्णनाची गोवंशिय जनावरे व वाहतुकीकरिता वापरलेल्या अशोक लेयलॅणड कंपनीचा ट्रक व डिझायर कंपनीची गाडी व मोबाईल असा एकूण 38,30,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला पंचनामा करून ताब्यात घेतले पुढील कारवाई करिता जनावरासह कोरपना पोलीस स्टेशनला नेण्यात आले यांच्या विरुद्ध कलम 5 अ 5 ब 6 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 2015 अन्वये सहकलम 11 (11) (ड) भारतीय प्राण्यास नि. वा. अधि 1960 प्रमाणे कारवाई करण्यात आली.

यावेळी कोरपणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत, उप केकन प्रभाकर जाधव. पंढरी सिडाम . यांच्या उपस्थिती कारवाई करण्यात आली व पुढील तपास सुरू आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये