ताज्या घडामोडी

माजी मुख्यमंत्री, लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवारजी १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळा

न्यू इंग्लीश हायस्कुलच्या भव्य पटागंणात तिन दिवशीय विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा जन्म १० जानेवारी १९०० रोजी चंद्रपूर जिल्हयातील मुल तालुक्यातील मारोडा या गावात झाला. यांचे माध्यमिक शिक्षिण हे जुबली हायस्कूल येथून पूर्ण झाले. यांच्या राजकिय जीवनाची सुरूवात १९१८ च्या स्वतंत्र चळवळीमधून झाली. तसेच महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होवून त्यांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.

पुढे त्यावेळीची मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या नागपूर शहराचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष झाले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले.तसेच संयुक्त महाराष्ट्र राज्याचे दुसरे व विदर्भातील पहिले मुख्यमंत्री झाले. संयुक्त चंद्रपूर जिल्हयाची आन-बान -शान लोकनेते स्वातंत्र्यसेनानी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या १२५ व्या जयंती निमित्य माजी खासदार मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात न्यु इंग्लीश हायस्कुल चंद्रपूर व दादासाहेब कन्नमवार अभ्यासिका, चंद्रपूर तर्फे विविधरंगी कार्यक्रम सर्किट हाऊस समोरिल न्यू इंग्लीश हायस्कूलच्या भव्य पटागंण, येथे तिन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून क्रिडा स्पर्धा, दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला मालार्पण, सांयकाळी ५ ते रात्रौ १० पर्यंत पुष्प प्रदर्शनी व स्वादिष्ठ व्यंजनाचा आनंद मेळावा तसेच सांय. ६ वाजता ज्यू. सचिन तेंदुलकर लाईव्ह कॉन्सर्ट (इंडियन ऑयडल कलाकारासह) म्युझिक गितांच्या कार्यक्रम व दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी क्रिडा स्पर्धा व बक्षिष वितरण या मंगलमय प्रसंगी सर्व जनतेनी होणा-या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते राहुल पुगलिया यांनी केले.

               आपला

            व्ही कुमार

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये