ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आशा सेविका या गावाचा कणा – मुख्य कार्यपालन अधिकारी जितीन रहमान 

800 आशांची उपस्थिती व छत्री वाटप ; 40 आशाचा सन्मान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आशा सेविका गावाचा कणा.आशा सेविका या गावात केंद्र व राज्य शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. नुकतीच आशाच्या कार्यासाठी दाखल घेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने मानधन वाढून 10 हजार करण्यात आले.त्या बद्दल आशांचे अभिनंदन देखील केले.आणि लवकरच याची अंमलबावणी करण्याचे आश्वासन देखील वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी नितीन रहमान दिले.दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित आशा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंचावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अभ्युदय मेघे, शरद पवार दंत महाविद्यालय संचालिका मनीषा मेघे डॉ.निमा आचार्य,डॉ.दीप्ती श्रीवास्तव,अभिनंदन दास्तेनकर, अविनाश सातव, अभिषेक जोशी, यांची मंचावर उपस्थितीत होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मेघे यांनी केले ते म्हणाले,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आशा सेविकासाठी आम्ही माई कार्ड सुरू केले असून त्याचा फायदा सर्व आशा ताईंनी घ्यावा.तसेच त्यांनी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेसाठी देखील आशा ताईंनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त माता बहिणींना फायदा करून देण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले.

पराडकर म्हणाले,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे काम वाखण्याजोगे आहे.या रुग्णाच्या माध्यमातून अनेक रुग्ण फायदा होतो आहे.

या कार्यक्रमात 40 आशा ताईचा सन्मान करण्यात आला.त्यांना शॉल,साडी, व रोख तीन हजार रुपये देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.तसेच अजय पेठे यांनी महाविद्यालयातील विविध कोर्सेसची माहिती दिली.

कार्यक्रमांचे संचालन सुमित उगेमुगे,तर आभार नाना शिंगणे मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राकेश आगडे,राजेश सव्वालाखे,सुशांत वानखेडे,मोहित साहरे, सुलोचना मोहोड, स्नेहा हिवरे, गंगाधर तडस,अंकित खैरकर,अभिजित कुटेमाटे,प्रिया गोडे,जितेश पानकावसे,विनया भरणे यांचे सहकार्य लाभले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये